छत्रपती

[एक आठवण शिवरायांची][bsummary]

किल्ले

[गड किल्ले][bigposts]

रणझुंजार मावळे

[वीर मावळे][twocolumns]

छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा
  छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यानिर्मितीचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी मोलाची साथ लाभली ते       त्यांच्या शूर आणि निडर मावळ्यांची.ज्यांना कशाची हि भयभिती नव्हती.


  जोपर्यंत आपले राजे बरोबर आहेत तो पर्यंत आपण कितीही मोठी मजल मारू शकतो हे जणू त्यांनी त्यांच्या 
मनावर कोरले होते.

pinarest.com
                 
  अशाच शूर मावळ्यांचा मागोवा घेताना इतिहास आपल्यासमोर एक अश्या मावळ्याचे नाव समोर ठेवतो जो  कि दिवसभर बहुरूप्याचे खेळ करून महाराजांना गुप्त माहिती पुरवत असे.त्यांचे नाव आहे. 

                           बहिर्जी नाईक

   ज्यांच्या बद्दल थोडस सांगायचे झाले तर अंगावर स्फुरण आल्याशिवाय राहणार  नाही.

                                   

             छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे ते प्रमुख होते. फकीर,कोळी,वासुदेव भिकारी,संत अगदी कुठलेही वेषांतर करण्यास ते तरबेज होते. शत्रूच्या देशात राहून जशास तशी राहणीमान, बोलीभाषा बोलण्यात ते निपुण होते.

दिल्लीचा बादशहा आणि विजापूरचा आदिलशा यांच्या दरबारात वेषांतर करून ते फिरत  असत.जराशी शंका आली तरी शत्रूचा माणूस ठरवून मृत्यू दंड देणाऱ्या सुलतानांची भेदक नजर कधीहि बहिर्जींचा  ठाव घेवू शकली नाही. यातच बहिर्जींचे असामन्य कर्तुत्व समावले आहे.                               

     छत्रपती शिवाजी महाराजाच्या गुप्तहेर खात्यात जवळपास तीन ते चार हजार गुप्तहेर काम करायचे .या सर्वांचे नेतृत्व बहिर्जी नाईक करत असत.हे सर्व गुप्तहेर  बहिर्जीनी  दिल्ली , विजापूर,कर्नाटक, पुणे व इतर 
 राज्यात पेरून ठेवली होती. महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत, हे नाईकांना माहित असत.
त्यापूर्वी   त्या ठिकाणची सर्व माहिती बहिर्जी व त्यांचे सहकारी महाराजापर्यंत पोहचवत असत. चुकीची माहिती देणार्यास कडेलोट हा पर्याय नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची  एक सांकेतिक भाषा तयार केली होती ती भाषा फक्त बहिर्जींच्या गुप्तहेरांना कळत.त्यात वेगवेगळे पक्ष्यांचे आवाज व इतर आवाज असत. कुठलाही संदेश एकमेकापर्यंत सांकेतिक भाषेत दिला जाई.


बहिर्जी नाईक फक्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये देखील होते. तलवारबाजीत-दांडपट्यात ते माहीर होते. कारण गुप्त हेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना माहीत होते.
pinarest.com
 कुठल्याही घटनेचा ते खूप बारकाईने विचार करीत. शत्रूचे गुप्तहेर कोण? ते काय करतात? ह्यांची देखील माहिती ते ठेवत. तसेच त्यांच्याकडे एखादी अफवा पसरवायची असल्यास किंवा शत्रूला चुकीची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करीत. फक्त शत्रूच्याच प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पूर्ण माहिती ते ठेवत.

                               
                  
शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणून त्यांचा सहभाग असायचा. त्यात अफजलखानाचा वध, पन्हाळ्यावरून सुटका, शाहिस्तेखानाची बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा, किंवा सुरतेची  लुट असो, अशा प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पूर्ण करत असत. ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रूची इत्यंभूत माहिती महाराजांना दिली होती. महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्ल्यांचा विचार करून पाऊल टाकत. 


youtube.com

 सुरतेची लुट चालू असताना जॉर्ज ओग्झेन्डन हा इंग्रज वखारवाला आपली वखार वाचवण्यासाठी शिवाजी महाराजासमोर  विनवणी करावयास गेला. तेव्हा महाराजांच्या बाजूला उभा असलेला इसम आणि आपल्या वखारीसमोरच्या भिकाऱ्यात त्याला साम्य आढळले. त्याने ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या अहवालात तसे नमूदही केले.

youtube.com


  हेर हे राजाचे डोळे आणि कान असतात हि म्हण सार्थ करणारे बहिर्जी नाईक महाराजांच्या अनेक यशस्वी मोहिमांमागे,धाडसी हल्ल्यांमागे, दूरवरच्या प्रदेशात अचानक जाउन केलेल्या लुटीमागे आणि सुखरूप परत येण्यामागे असणारी कल्पक, चतुर, प्रसंगावधानी आणि हरहुन्नरी व्यक्ती.

अश्या ह्या बहिर्जी नाईकांपासुन व त्यांच्या हुशारी पासुन आपण शिकण्यासारखं बरच काही आहे. हे शक्य झालं नाही तरी नाईकांचे स्वराज्यासाठीचे लाखमोलाचे योगदान विसरु नका.
youtube.com

         छत्रपती शिवरायांचा तिसरा डोळा म्हणून दिली गेलेली उपाधी सर्वच दृष्टीनी सार्थ ठरते.
  • बहिर्जीच्या जीवनावर पंडित कृष्णकांत नाईक यांनी लिहिलेले 'बहुरूपी हेर बहिर्जी नाईक' हे छोटेखा
  • नी-२४पानी- पुस्तक आहे. (याच लेखकाचे 'बुद्धीसागर नाना फडणीस' हे ३२ पानी पुस्तक आहे.)
  • बहिर्जी नाईक (लेखक- प.रा. दाते)


         

1 comment:

जय शिवराय
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यानंतर वीरश्री संचारणार नाही असे होणार नाही. तुम्हालाही शिवरायांची ही कामगिरी पुढील पिढीपर्यंत जावी असे वाटत असेल तर तुम्ही शिवाजी महाराजांच्या कथा त्यांना सांगायला हव्यात. या महानायकाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यापेक्षा त्यांचा आदर्श, त्यांचे विचार शिकवून करायला हवी.
या पेजच्या माध्यमातून आपण शिवाजी महाराजांचे विचार आणि इतिहास जनसामन्यात तळागाळापर्यंत पोहोचणे हेच आपले ध्येय.

जय जिजाऊ जय शिवराय