छत्रपती

[एक आठवण शिवरायांची][bsummary]

किल्ले

[गड किल्ले][bigposts]

रणझुंजार मावळे

[वीर मावळे][twocolumns]

अवघ्या सातशे मावळ्यांनिशी दिलेरखानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या योद्ध्याची शौर्यकथा

       

                 एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत होते.पण म्हणतात न चांगल्या गोष्टीला पण विरोधक असतात त्याप्रमाणे अनेक जहागीरदर , वतनदारांचा महाराजांच्या स्वराज्याला विरोध होता.


   

             त्यापैकी एक होते जावळीचे मोरे घराणे जे आदिलशाही सरदार होते.परंतु लवकरच चंद्रराव मोरेंनी महाराजांशी उघड शत्रुत्व आरंभले.

shivbharat.com
             
                  जावळीच्या चंद्रराव मोऱ्याशी चालू असलेल्या संघर्षात महाराजांना मोऱ्यांच्या सैन्यातून लढणाऱ्या सैनिकाचे विलक्षण कौतुक वाटले.
    
            स्वराज्यनिर्मितीच्या लढ्यात अशा शूर मावळ्याचा उपयोग होईल हे जाणून जावळीच्या विजयानंतर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरारबाजीला मराठा सैन्यात दाखल करून घेतले.तेव्हा पासून मुरारबाजी देशपांडे शिवकार्यात सामील झाले.

          १६५६ मधे शिवरायांना जावळीच्या स्वारीतून मोर्‍यांच्या तुर्‍यातले एक अमूल्य रत्न मिळाले होते. या रत्नाचे नाव होते                                                                     मुरारबाजी देशपांडे                                                        

                     


                                         महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव.                          इतिहासातील सर्वांत प्रसिद्ध घटना म्हणजे मुरारबाजी देशपांडेनी दिलेरखानाला अखेरच्या श्वासापर्यंत दिलेला लढा. दिलेरखानाने कपिलधारेच्या बाजुने वज्रगडावर तीन तोफा चढवण्यास सुरुवात केली. वज्रगडाचे तत्कालिन किल्लेदार यशवंत बुवाजी प्रभू आणि त्यांचे बंधू बाबाजी बुवाजी प्रभू यांनी अवघ्या तीनशे मावळ्यांच्या मदतीने दिलेरखानाला निकराची लढत दिली. १५ दिवस जिवाच्या आकांताने किल्ला झुंजवला, पण दिलेरखानांच्या तोफांच्या मार्‍यापुढे गडाचा वायव्य बुरूज ढासळला आणि गड दिलेरखानाच्या ताब्यात गेला.  मुघलांच्या लांबपल्ल्याच्या तोफांपुढे पुरंदरची शक्ती असलेला वज्रगड पडला. आता वेळ पुरंदरची! पुरंदराच्या अस्तित्वाला बसलेला हा सगळ्यात मोठा धक्का होता. पण मुरारबाजी याही अवस्थेत तो तडफेने लढवत होते.
picuki.com
१६६५ च्या आषाढातील तो एक भयाण दिवस......
         १६ मे १६६५ या दिवशी मुरारबाजींच्या मनात एक धाडसी विचार आला. ते धाडस भयंकरच होते. गडावरून सुमारे सातशे योद्धे सोबत  घेऊन उत्तरेच्या बाजूने एकदम मोगलांवर अन् खुद्द दिलेरखानवरच तुटून पडायचे असा हा विचार होता.                                                         त्याला एक कारणही होतेच. कारण मुरारबाजी एक कसलेले योद्धे होते. एकच वर्षापूर्वी सिंहगडाभोवती मोर्चे लावून बसलेल्या जसवंतसिंह या मोगली राजपूत सरदारावर सिंहगडच्या मराठी किल्लेदारानं अवघ्या काहीशे मावळ्यांच्यानिशी असाच भयंकर धाडसी हल्ला गडातून बाहेर पडून चढविला होता. तो पूर्ण यशस्वी झाला होता. मार खाऊन जसवंतसिंह आणि मोगली फौज उधळली आणि पळून गेली होती. हे मुरारबाजींना माहीत होते. हीच कल्पना आताही वापरली तर? नाहितरी पुरंदर शेवटच्या घटका मोजतोय, कधीही मोगलांच्या ताब्यात जाऊ शकतो. प्रयत्न यशस्वी झाला तर इतिहास घडेल. 
//ofgogoatan.com/afu.php?zoneid=3316071
               मुरारबाजींनी एकदम दिलेरखानाच्याच रोखाने गडावरून खाली झेप घेतली. भयंकर कल्लोळ उडाला.मुरारबाजीचे या आगीतील शौर्यतांडव पाहून खान त्याही स्थितीत विस्त्रित झाला. 
sharechat
                 त्याने मुरारवरील मोगली हल्ला स्वत:च हुकूम देऊन हटविला. थांबविला. तो निथळता मुरार खानासमोर काही अंतरावर झुंजत होता. तो थांबला. दिलेरखानाने त्याला मोठ्याने म्हटले ,
            ' अय बहाद्दूर , तुम्हारी बहादुरी देखकर मैं निहायत खुश हुँआ हूँ। तुम हमारे साथ चलो।                                        हम तुम्हारी शान रखेंगे! '
हे उद्गार ऐकून मुरारबाजी उलट भयंकरच संतापला. हा खान मला फितुरी शिकवतोय. याचाच त्याला भयंकर संताप आला. मुरार बाजीने त्याच संतापात जबाब दिला. 
                                  ' मी शिवाजीराजाचा शिपाई. तुझा कौल घेतो की काय ?'
आणि मुरार बाजी दिलेरच्या रोखाने तुटून पडला. पुन्हा युद्ध उसळले. मुरारबाजी आता आपल्याशीच लढायला येतोय हे पाहून खानाने धनुष्यबाण हाताशी घेतला. धनुष्याचा दोर अगदी कानापर्यंत खेचून मुरारबाजीच्या कंठाचा वेध घेतला.बाण सोडून मुरार बाजीला ठारही केले.
wordpress
                       एक महान तेज सूर्यतेजात मिसळले गेले. हे तेज म्हणजेच महाराष्ट्र धर्माचे तेज.
त्याने दिलेल्या लढ्याचे सभासदखानाच्या बखरीत रोमांचक वर्णन करण्यात आले आहे –
सात हजार पठाण आणि मुठभर मावळे. पण पहिल्या हल्ल्यातच पांचशे पठाण लष्कर ठार जाहालें. खासा मुरार बाजी परभू माणसांनिशी मारीत शिरला. तेंव्हा दिलेरखान बोलिला ‘अरे तूं कौल घे. मोठा मर्दाना शिपाई तुज नांवाजितों.’ त्यावर मुरार बाजी बोलले, ‘तुजा कौल म्हणजे काय? मी शिवाजीराजाचा शिपाई, तुझा कौल घेतो कीं काय?’ असे म्हणत तो खानावर चालून गेला. हातघाईचे युद्ध जहाले. तोच खानानें आपले आगें कमाण घेऊन तीर मारून काम पुरा केला. मग तोंडात अंगोळी घालत म्हणाला ‘असा शिपाई खुदाने पैदा केला!’ मुरारबाजीबरोबर तीनशें माणूस ठार जाहालें’

संदर्भ :-
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
मोरे बखर
फोटोसाठी साभार

जय शिवराय
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यानंतर वीरश्री संचारणार नाही असे होणार नाही. तुम्हालाही शिवरायांची ही कामगिरी पुढील पिढीपर्यंत जावी असे वाटत असेल तर तुम्ही शिवाजी महाराजांच्या कथा त्यांना सांगायला हव्यात. या महानायकाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यापेक्षा त्यांचा आदर्श, त्यांचे विचार शिकवून करायला हवी.

एक आठवण शिवरायांची   Ak Athvan Shivrayanchi

 या पेजच्या माध्यमातून आपण शिवाजी महाराजांचे विचार आणि इतिहास जनसामन्यात तळागाळापर्यंत पोहोचणे हेच आपले ध्येय.

जय जिजाऊ जय शिवराय