छत्रपती

[एक आठवण शिवरायांची][bsummary]

किल्ले

[गड किल्ले][bigposts]

रणझुंजार मावळे

[वीर मावळे][twocolumns]

वीर बाजीप्रभू देशपांडे

                   
         बाजी प्रभू देशपांडे पुणे  जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशपांडे होते. बाजी प्रभू हे हिरडस मावळचे वतनदार असणाऱ्या बांदलांचे दिवाण होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले. 

                      
                                बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पिली. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते.

    बाजी प्रभू देशपांडे, हे नाव जरी ऐकलं तरी आपल्या समोर उभी राहते भरभक्कम आणि             हातात दांडपट्टे घेऊन रक्तबंबाळ होऊनसुद्धा शत्रूला यमसदनी पाठविणारी मुद्रा !सिद्दी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडे निघाले होते. प्रभू आणि सुमारे ६०० बांदल मावळे यावेळी महाराजांच्या समवेत होते. त्या वेळी विजापूर सैन्याला आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन विजापुरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते.                   पुढचा धोका लक्षात घेऊनच वडीलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले.
        “राजे, आपले सैन्य अनेक तास चालून थकले आहे, आपण सारे असे चालत राहिलो तर सिद्दीचे ताज्या दमाचे सैन्य आपल्याला सहज गाठेल, त्यापेक्षा राजे तुम्ही काही सैन्य घेऊन पुढे विशाळगडाकडे निघा आणि मी काही सैन्य घेऊन या घोडखिंडीत सिद्दीच्या सैन्याला रोखून धरतो.”


 राजे म्हणाले, “बाजी अहो शत्रूचे सैन्य सुमारे १०,००० आणि तेही ताज्या दमाचे, आपण मात्र ६०० ! आपण यांचा मुकाबला कसे करणार?” यावर आपले बाजी म्हणतात, “राजे, तुम्ही ३०० सैन्याची तुकडी घेऊन विशाळगडाकडे रवाना व्हा आणि उरलेल्या ३०० सैनिकांना घेऊन मी घोडखिंडीत थांबतो, तुम्ही विशाळगडाचा वेढा फोडून गडावर पोहोचलात कि तोफेचे  बार करा म्हणजे तुम्ही सुखरूप पोहोचलात याची मला खबर मिळेल.”
राजे काहीवेळ बाजीकडे पाहत राहिले, राजे उद्गारले बाजी, “१०,००० विरुद्ध ३०० हे कसे शक्य होईल ?”

बाजीप्रभूंनी यावर उत्तर दिले, “राजे, हा बाजी जो पर्यंत या खिंडीत उभा आहे तोपर्यंत एकाही गनिमाला या खिंडीच्या पार होऊ देत नाही, तुम्ही तोफेचे बार करीत नाही तोपर्यंत हा बाजी मरणार देखील नाही.”      
बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्दीच्या सैन्यासाठी महाकाल म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली आणि पराक्रमाची शर्थ केली. 

    


    सिद्दी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वतःचे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते.

                       

              

                          

    खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता.


PINAREST

             अखेर शिवाजी महाराज 300 मावळ्यांना घेऊन विशालगडावर पोहोचले. यावेळी विशालगड मुघल सरदार सुर्वे याच्या ताब्यात होता. त्याचा पराभव करून शिवाजी महाराज या गडावर आले होते. त्यानंतर  तोफ चालवून बाजी प्रभू देशपांडे यांच्या नेतृत्वातील लष्कराला संदेश देण्यात आला. परंतु, तोपर्यंत फार वेळ झाला होता. बाजी प्रभू देशपांडे जबर जखमी झाले होते.
  


PINAREST
 तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले .बाजींनी आपला रक्ताने लालबुंद झालेला देह सोडला.
संदर्भ

  1. बांदल घराण्याची तक्रीर (राजा शिवछत्रपति - गजानन भा. मेहेंदळे)
  2.  जेधे शकावली