छत्रपती

[एक आठवण शिवरायांची][bsummary]

किल्ले

[गड किल्ले][bigposts]

रणझुंजार मावळे

[वीर मावळे][twocolumns]

उन्मत्त हत्तीला लोळवनाऱ्या रणझुंझार मावळ्याची कथा

जे स्वराज्य द्रोही होते ते हत्तीच्या पायाखाली गेले तर काही स्वामिनिष्ठ होते त्यांनी हत्तीलाही नमवल                                                      अशाच एका  रणझुंझार मावळ्याची कथा.
facebook
१६७६ साली राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडे कूच केली मोगल शाही संपवण्यासाठी त्यांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशहाशी हात मिळवणी केली गोवळकोंड्यात महाराजांचे जंगी स्वागत झालं मुगल शाही आदिलशाही निजामशाही अश्या साऱ्या शह्यांच्या उरावर उभ राहून स्वराज्य निर्माण करणारा जाणता राजा आलाय म्हणून लोकांनी खूप गर्दी केली महाराजांसोबत सरनोबत हंबीरराव मोहिते,सूर्याजी मालुसरे,येसाजी कंक इत्यादी निवडक मावळे होते या सगळ्यांनी महालात प्रवेश केला.
asian voice
गोवळकोंड्याचा कुतुबशहा महाराजांना म्हणतोय "महाराज आपकी फौज देखकरं हमे बडी खुशी हुये लेकीन ताजू ब की बात ये हे की आपकी फौज मे हमने हाथी नही देखा"
यावर महाराज उत्तरले  "आमच्या कडे पण्णास हजार हत्ती आहेत म्हणजे आमचा एक एक मावळा हत्तीच्या ताकतीचं आहे "
यावर कुतुबशहा म्हणतोय "हत्तीच्या ताकतीचां माणूस कस शक्ययं आणि असेल एखादा असा मावळा तर काय तो माझ्या हत्तिशी झुंज देईल" 
महाराज म्हणतायत "का नाही यातील कोणताही मावळा निवडा तो तुमच्या हत्तीशी झुंज देईल"
कुतुबशहा न प्रत्येक मावळ्यावर कुंचीतसी नजर फिरवली व येसाजी कडे बोट दाखवत विचारलं "क्या ये सिपाई लढेगा हाथी से"
 महाराजांनी मोठ्या आत्मविश्वासानं उत्तर दिलं "का नाही माझा हा मावळा तुमच्या उन्मत्त हत्तीला च काय इंद्राच्या आईरावतालही लोळण घालायला भाग पाडेल"

मग युद्धाचा दिवस ठरला किल्ल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या पटांगणात गोलाकार मैदान बनवण्यात आले महाराज आणि कुतुबशहा साठी बाजूला शामियाना उभारण्यात आला
हत्ती आणि माणसाची झुंज, कशी शक्य आहे ? सर्वजण आपसांत कुजबुज करीत होते. पण स्वराज्याच्या मावळ्यांना हे शक्य होत. येसाजी ने महाराजांना झुकून मुजरा केला आणि नंग्या तलवारी निशी मैदानात उतरला आणि हत्तीला ही साखळदंडातून मोकळ करून मैदानात आणण्यात आले.

puneri speaks
युद्धाला सुरुवात झाली येसाजिला पाहून हत्ती चवताळून येसाजिच्या अंगावर धावून गेला अन येसाजी न डाव्या अंगाला उडी मारून हत्तीला हुलकावणी दिली
 हत्ती आपला वेग रोखू न शकल्या मूळे तसाच पुढे गेला हत्ती आता चवतळला होता दोन अडीच तास झुंज चालू होती कधी येसाजी पुढे तर कधी येसाजी हत्तीच्या मागे आता हत्ती बेभान झाला होता त्याने येसाजीला आपल्या सोंडत पकडलं 
अन लोकांना वाटल आता संपला येसाजी     पण येसाजी न हत्तीच्या सोंडवर तलवारीने असा घाव केला की जखमी झालेला हत्ती वेड्यासारखा पळत सुटला तो पुन्हा आलाच नाही.
youtube

कुतुबशहाच्या हट्टपायी एका हत्तीचा जीव गेला होतापण महाराजांचा एक एक मावळा हा हत्तीच्या ताकतीचां असतो हे सिद्ध झालं

कुतुबशहा न येसाजीला आपल्या गळ्यातील हार भेट देऊ केला पण येसाजीन तो हार न घेता आमचं कौतुक करायला आमचा राजा समर्थ हाय माझा हा पराक्रम माझ्या राज्याच्या चरणी अर्पण करतो अस सांगितलं

=====================================================================

संदर्भ :- शूर शिलेदार येसाजी कंक - इतिहास संशोधक कृष्णकांत नाईक.