छत्रपती

[एक आठवण शिवरायांची][bsummary]

किल्ले

[गड किल्ले][bigposts]

रणझुंजार मावळे

[वीर मावळे][twocolumns]

"समरभूमी उंबरखिंड" एक विजय गनिमी काव्याचा

                                           उंबरखिंड 

पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवरील आणि सह्याद्रीच्या कुशीत दडलेली खिंड .  खिंड म्हणजे दोन डोंगरांच्या मधली वाट.

                      by youtube               

शिवाजी महाराजाच्या प्रगल्भ युद्ध तंत्राची झलक दाखवणारी आणि इतिहासाचे भावविश्व उलगडून दाखवणारी मंत्रमुग्ध करणारी उंबरखिंड इतिहासात आगळीवेगळी ओळख जपून आहे.                                                                  
             

 खिंड हा भौगोलिक शब्द इतिहासाशी जुळवला की, अनेक रोमहर्षक प्रसंग आपल्या डोळयांसमोर उभे राहतात. विशालगडाची पावनखिंड असो वा नेसरीची खिंड असो, वा रायगडमधील उंबरिखड असो.. या ऐतिहासिक खिंडींनी शिवकाळात अनेक संघर्षाचे क्षण अनुभवले. नुसतेच अनुभवले नाही तर मराठयांच्या हातात हात घालून शत्रूचं कंबरडं मोडण्यात मोलाची भूमिका निभावली. म्हणूनच या खिंडीचं नाव जरी निघालं तरी एक वेगळंच चैतन्य संपूर्ण शरीरात सळसळतं.

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरून  खोपोली फाटा मार्गे पाली कडे जाणाऱ्या रस्त्याला १० ते १२ किलोमीटर गेल्यावर डाव्या हाताला "समरभूमी उंबरखिंड" कडे असा फलक दिसतो.

By trekking movements
त्या बाजूला वळून अंबा नदीच्या पश्चिम बाजूला वळून आत जायच, त्यापुढे नदीपात्रात जाण्याचा रस्ता लागतो जातेवेळेस रस्त्यात लढाईची माहिती देणारा फलक दिसतो.


अंबा नदीच्या पात्रात पोहचल्यावर खडकांच्या सपाटीवर अतिशय समपर्क आणि  सुंदर विजयतंभ उभारला आहे.
 by r r explorer.com


 उंबरखिंड युद्ध विजयस्तंभेची उंची १२.५० मीटर उंचीचे असून, स्तंभाच्या समोरील बाजूस शिवाजी महाराजांचे शस्त्रसज्ज वेशातील शिल्प आहे. मागील बाजूस उद्घाटनाची कोनशिला असून , डावीकडे आज्ञापत्रातील वृक्षा विषयीची माहिती व उजवीकडील बाजूस उंबरखिंडच्या लढाईचा थोडक्यात इतिहास कोरलेला आहे. दगडी स्तंभाच्या वर ढाल, तलवार, भाला, धनुष्य, ध्वजस्तंभ ह्याच्या मोठ्या प्रतिकृती करुन ठेवल्या आहेत.

 यासमोर पोहोचल्यावर जवळपास ३५८ वर्षापूर्वीचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो . या विजयासाठी स्वराज्यनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज आणि गरुडासारखा भिरभिरणारा सेनापती नेताजी पालकर व मराठ्याची अजिंक्य सेना डोळ्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही. चारही पातश्याहाना शिवरायांनी  धमक दाखविली ती याच सह्याद्रीतून.
By viralmaharashtra.com
 उंबरखिंड शौर्य,पराक्रम आणि गनिमी तंत्राने छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेली ती हि लढाई .

लढाई :-

  इ.स.१६६० ला शाहिस्तेखान  मुघलांच्या दख्खन सुभ्याचा सुभेदार म्हणून दक्षिणेत आला व मे १६६० ला पुण्यात येऊन राहिला. जून १६६० ला शाहिस्तेखानाने शिवाजी राजांचा चाकणचा कोट जिंकून घेतला .१६६० च्या शेवटी आदिलशहाच्या गालिब ह्या किल्लेदाराला हरवून परांडा कोट मुघल सरदार कारतलब खान याने जिंकून घेतला. १६६१ च्या सुरुवातीला शाइस्ताखानाने कारतलब खानास शिवाजी राजांच्या ताब्यात असलेल्या उत्तर कोकण भागातील चौल , कल्याण , भिवंडी , पनवेल , नागोठणे ही ठिकाणे हस्तगत करण्यासाठी रवाना केले. कारतलब खानासोबत कच्छवाह , चतुरभूज चौहान , अमरसिंह चंद्रावत , मित्रसेन व त्याचा भाऊ , सर्जेराव गाढे , सावित्रीबाई उर्फ रायबाघण , जसवंतराव कोकाटे , जाधवराव हे मुघलांचे सरदार ह्या मोहिमेत होते.
 याशिवाय पायदळ व घोडदळ, अंदाजे २०००० ,घोडे,तोफा,हत्ती ,अनेक शत्र-अस्त्र ,खजिना असा मोगली सरंजाम होता.
खान पूणे, तळेगाव- वडगाव- मळवली मार्गे लोणावळ्याकडे सरकला वास्तविक पाहाता वाटेवरील लोहगड, विसापूर किल्ले स्वराज्यात होते, पण महाराजांच्या आज्ञेमुळे या किल्ल्यावरुन खानाच्या सैन्याला कोणताच विरोध झाला नाही. कारण उंबरखिंडीत खानाला कोंडीत पकडून झोडपून काढणे शक्य होते.
By esakal.com
  महाराजांनी नेताजीला खानाच्या वाटेवरील पाणवठ्यांची, विहिरींची कोंडी करण्याचा हुकूम दिला. त्यामुळे खानाची फौज तहानेने हैराण झाली.
खानाला उंबरखिंडीत खेचून आणण्यासाठी महाराजांनी पेण जवळ सैन्याची जमवाजमव केली व ही खबर खानापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली. खानाने कुरवंडा घाटाने उतरण्याचा निर्णय घेतला व खानाची फौज तो दुष्कर घाट उतरु लागली. नळीसारख्या बारिक वाटेने मुघल सैन्य सह्याद्रीचा डोंगर उतरत होते. घाट उतरुन मुघल सैन्य पुढे उंबरखिंडीत आले.
  जानेवारी महिना असल्यामुळे अंबा नदीला पाणी नव्हते. आधीच तहानलेली फौज दुपारच्या उन्हाने   गलितमात्र झाली होती. अशावेळी खानाने सैन्याला पुढे जाण्याची आज्ञा केली. खानाचे सैन्य उंबरखिंडीच्या नळीत गाभ्यात शिरले. आता सूर्य तळपत होता. वाटेत पाण्याचे दुर्भिक्ष आणि अचानक कर्णे वाजू लागले. खानाचे सैन्य व घोडे थबकले. काय झाले ते कळायच्या आत  ‘हर हर महादेव’ ची गर्जना खिंडीत घुमली आणि हल्ला झाला.
उंबरखिंडच्या घनदाट अरण्यात लपून बसलेल्या शिवाजी राजांच्या सैन्याने मुघलांवर बाणांच्या वर्षावाने व तोफांच्या गोळ्यांनी हल्ला सुरू केला.
    बाजूच्या टेकड्यामुळे व घनदाट अरण्यामुळे मराठ्यांना नैसर्गिक संरक्षण मिळत होत. पण खानाची फौज वेगाने कापली, मारली जात होती.मुघल सरदार मित्रसेन व अमरसिंह यांनीही मराठा सैन्याचा बाणांचा हल्ला करुन प्रतिकार करण्यास सुरुवात केला. जंगलात व डोंगरावरुन गनिमी कावा पद्धतीने युद्ध करणार्‍या मराठा सैन्याला घाबरुन मुघल सैनिक मार्ग मिळेल तेथे पळत होते. 
  त्यांना हल्ला कुठून होत आहे तेच कळत नव्हते. त्यातच शिवाजी महाराज स्वत: ठाकूरवाडीच्या टेकडीवर सैन्य घेऊन उभे आहेत, म्हटल्यावर मोघलांचा धीर खचला मागे सह्याद्रीचा खडा पहाड चढणे शक्य नव्हते, तो रस्ता नेताजीच्या सैन्याने बंद केला होता.
 पण सर्व मार्ग शिवाजी राजांच्या सैन्याने अडवून धरले होते. मुघल सैन्याचे मराठा सैन्याकडून प्रचंड हाल होत असताना रायबाघण यांच्या सल्लावरुन कारतलब खानाने तह करण्यासाठी शिवाजी राजांकडे दूत पाठवला.
By mayboli.com
     पाठीवर बाणांचे भाते , एका हातात धनुष्य व दुसर्‍या हातात भाला , कमरेला तलवार , मस्तकावर शिरस्त्राण, शरीरावर चिलखत व ढाल ह्या युद्धसज्ज वेशात शिवाजी राजे घोड्यावर बसलेले होते.
कारतलब खानाचा दूत शिवाजीराजांकडे आला व "कारतलब खान पूर्ण शरणागती पत्करतो आहे व ह्या प्रदेशातून बाहेर पडण्यासाठी परवानगी मागत आहे." हा संदेश दुताने शिवाजी राजांना दिला.आपली सारी साधन संपत्ती आहे तिथेच सोडून कारतलबने निघून जावे. त्याच्या सैन्यातील स्थानिक लोकांना राजांकडे यायचे असेल तर त्यांना तशी अनुकूलता दर्शवावी यांसारख्या अटी खानापुढे ठेवल्या गेल्या. सगळ्याच्या सगळ्या अटी मान्य करण्याशिवाय खानापुढे पर्याय नव्हता. 
 शिवाजी राजांनी विनंती मान्य करुन , कारतलब खानाला मुघल सैन्यासह निघून जाण्यास सांगितले. 
  हा संदेश दूताने कारतलब खानाकडे पोहोचवला. तेव्हा कारतलब खान,  इतर मुघल सरदारांनी शिवाजी राजांना खंडणी पाठवली. उंबरखिंडीच्या वेगवेगळ्या भागात लढत असलेल्या मराठा सैन्याला युद्धबंदीचा संदेश देण्यात आला व मुघल सैन्याला आल्या वाटेने परत पाठवण्यात आले.
             
                                 By -bangladesh post

                                         उंबरखिंडीत 2 फेब्रुवारी १६६१ रोजी खानाचा पराभव झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त १००० मावळ्याच्या मदतीने कारतलब खानाच्या २०००० सैन्याचा  कानिमी काव्याने  पराभव केला.आणि उंबरखिंडित  विजय मिळविला.

उंबरखिंडची लढाई  शिवाजी राजे व मुघल सरदार कारतलबखान ह्यांच्यात २ फेब्रुवारी १६६१ रोजी झाली. उत्तर कोकण काबिज करण्यासाठी निघालेल्या मुघल सैन्याला , शिवाजी राजांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने उंबरखिंडच्या दरीत गनिमी कावा पद्धतीने हल्ला करुन , मुघल सैन्याचा पूर्ण पराभव केला.

                                    

संदर्भ

  1.  परमानंद, कवींद्र. श्री शिवभारत. भारत इतिहास संशोधन मंडळ,पुणे. pp. Page 291, 292.
  2. 'किल्ला' दिवाळी अंक २०१२. p. १५० ते १५४.