छत्रपती

[एक आठवण शिवरायांची][bsummary]

किल्ले

[गड किल्ले][bigposts]

रणझुंजार मावळे

[वीर मावळे][twocolumns]

छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले

     छत्रपति संभाजीएक ज्वलंत व्यक्तिमत्वशिवरायांचा छावा,थोरले छत्रपति, सईबाई  आणि जिजाउंच्या काळजाचा तुकडा।येसूबाई दुर्गाबाईंच्या कपाळी चमकणारा महातेजस्वी भास्करज्याला आपल्या ओंजळित घेताना मृत्युसुद्धा हळहळला असेलप्रत्यक्ष यमधर्माचेही डोळे पाणावले असतीलआपल्या देहदानाने महाराष्ट्राला जीवदान देणारा आणि मरणोत्तर मराठी माणसाच्या मनावर राज्य करणारा राजा....
malika sambhaji maharaj zee marathi cast sambhaji maharaj zee marathi ringtone sambhaji maharaj zee serial sambhaji maharaj sakhaldand sambhaji maharaj details sambhaji maharaj 1689 sambhaji maharaj 1 sambhaji maharaj 1 episode sambhaji maharaj 14 may sambhaji maharaj 13 feb sambhaji maharaj 1st win killa sambhaji maharaj 11 march sambhaji maharaj 14 february sambhaji maharaj part 1 sambhaji maharaj 2020 sambhaji maharaj 29 february sambhaji maharaj 2 sambhaji maharaj 2nd wife sambhaji maharaj 24 february 2020 sambhaji maharaj 29 feb 2020 episode sambhaji maharaj 24 march sambhaji maharaj 28 feb 2020 sambhaji maharaj episode 2 sambhaji maharaj 2 movie sambhaji maharaj 3d photo sambhaji maharaj 3d images sambhaji maharaj 3d shivaji maharaj 3d photo shivaji maharaj 3d frame shivaji maharaj 3d shivaji maharaj 3d photo frame shivaji maharaj 3d drawing sambhaji maharaj episode 3 sambhaji maharaj 4k wallpaper sambhaji maharaj part 4 shivaji maharaj 5 shivaji maharaj 56 shivaji maharaj 50 photo sambhaji maharaj episode 5 sambhaji raje 6 shivaji maharaj 6 sambhaji raje 6 video shivaji maharaj 7 shivaji maharaj 9
                                                                  By - mithak.com

                  छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले

बालपण

संभाजी राजांचा जन्म १४ मे इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला.राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले.

संभाजी महाराजांची आई , सईबाई ह्या संभाजी राजेंच्या लहानपणीच वारल्या होत्या.लहान असतानाच महाराज आईविना पोरके झाले होते.त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ पाटील गाडे  ही  स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजीं राजेंचा सांभाळ त्यांची आजी  जिजाबाई यांनी केला. महाराजांचे बालपण हे जिजाऊंच्या देखरेखी खाली गेले.  त्यांच्या सावत्र आई, पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली..
By - Hindivivek.
अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. दिसायला ते राजबिंडे होते
तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मुघली सैनिकांचा संभाजी राजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.
१६७२ च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणारा एक फ्रेंच प्रवाशी  ऍबे कँरेसंभाजी महाराजाविषयी काय म्हणतो -
...हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजीराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापीचीही बरोबरी करील इतका तो तयार आहे. तो मजबूत बांध्याचा असून अतिस्वरुपवान आहे. त्याचे सौंदर्य हाच सैनिकांचे त्याचेकडे आकर्षण वाढविणारा मोठा गुण आहे. सैनिकांचे त्याच्यावर फार प्रेम आहे व ते त्याला शिवाजीसारखाच मान देतात. फरक इतकाच ह्या सैनिकांस संभाजीच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते..."
             - ऍबे कँरे (१६७२ च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणारा एक फ्रेंच प्रवाशी)
By - puneri speaks


तारुण्य  आणि  मतभेद

इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले.
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी एक वकील आला होता त्याचे नाव होते हेन्री ओक्सिटन....अणि या हेन्री ओक्सिटन ने एकडायरी लिहली त्यात तो लिहतो की.
 ...मी रायगडा वर आलो मी शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाचा सोहळा बघितला अणि या सोहळ्याच्या वेळी माझी भेट झाली ती शिवाजी राज्यांच्या मुलाशी म्हणजे संभाजी राज्यांशी त्यावेळी माझ्या लक्षात आलेकी....हा संभाजी राजा इथल्या रयतेशी मराठीत बोलतो .... उत्तरेतल्या लोकांशी हिंदी मधे बोलतो.... आम्हा इंग्रजांशी इंग्रजी मधे बोलतो......पोर्तुगिजंशी पोर्तुगीज मधे बोलतो ....अरे या शिवाजी राजांनी आपल्या मुलाला भाष्या शिकवाल्यात तरी कीती ....संभाजी राज्यांच १४ भाष्यांवर प्रभुत्व होत..
--हेन्री ओक्सिटन
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात मातोश्रींचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजीराजांचा महाराजांचे अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. पण संभाजीराजांना ते मान्य होणे कठीण होते. अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले.
दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले; हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या सांगण्यावरुन केले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले.

छत्रपती :-

१६ जानेवारी १६८१ मध्ये संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजीराजांविरुद्ध कट केला आणि त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्‍यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारले.
By - Daily Hunt


छत्रपति संभाजी महाराजांचे धार्मिक धोरण

दि. ६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी गोपळभट अग्निहोत्री महाबलेश्वरकर यांच्या पुत्रास लिहिलेल्या पत्रात एक अतिशय समर्पक असे वाक्य आले आहे. ते वाक्य असे, '...राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य...'. युवराज शंभू राजे छत्रपती झाल्यानंतर त्यांचे अलौकिक आणि अद्भुत अशा कार्याचा जर कुणी आढावा घेतला तर त्याला पदोपदी या वाक्याची प्रचीती येते. त्यांचे राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहितदक्षता या सर्व बाबींमध्ये त्यांनी आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला दिसतो. या प्रमाणेच त्यांच्या धार्मिक धोरणावरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो.

संतजनांस राजाश्रय :-

१. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे पुत्र महादोबा गोसावी यांस छत्रपती संभाजी महाराजांनी वर्षासनाची नेमणूक करून दिली. (दि. १९ ऑगस्ट १६८०)
२. शिवकालातील प्रसिद्ध पाटगावचे मौनीबाबा यांच्या पालखीस भोई व वाजन्त्रीची कायमची व्यवस्था लाऊन दिली. त्यासाठी वार्षिक १२५ होनांचे आज्ञापत्र करून दिले. (दि.१३ सप्टेंबर १६८०)
३. चिंचवडचे श्री मोरया गोसावी यांच्या 'माणसांस, शेतापोतांस तसेच गुरांढोरांस काडीचाही तसविज देऊ नये' यासाठी आपल्या लष्करी अधिकाऱ्यास ताकीदपत्र लिहिले. (दि. ६ नोवेंबर १६८०)  
५. प्रचंडगडाच्या पायथ्याशी गडाच्या संरक्षणासाठी आलेल्या लोकांच्या गाई व म्हशी यांची चराई (वणी) छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांनी पण माफ केली (दि. ३१ मार्च १६८१)
६. श्री समर्थांनी अवतारकार्य पूर्ण केल्यावर त्यांच्या मागे सज्जनगड व चाफळ येथील धर्मादाय ऐवज, उत्सव, देवस्थानांची व्यवस्था, यात्रा, समर्थांच्या निर्वाणस्थळी हनुमानाचे देवालय उभारणे इत्यादी गोष्टींकडे जातीने लक्ष पुरविले. त्या संबंधी आपल्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना, आज्ञा, प्रसंगी ताकीद व कडक शब्दात कानउघाडणी देखील केली आहे. या संबधी एका पत्रात संभाजी महाराजांनी कऱ्हाड प्रांताचा सुभेदार रंगो विश्वनाथ यास '...श्री चे कार्यास हैगै कराया तुम्हास काय गरज?...' अशा स्पष्ट शब्दात खडसावले आहे.
७. चिंचवडच्या देवस्थानास आपल्या लष्कराकडून उपद्रव होतो अशी तक्रार आल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी पुणे प्रांताच्या सुभेदार व जुमलेदारांना '...जो धामधूम करील त्याला स्वामी जीवेच मारतील...अशी अत्यंत परखड शब्दात समज दिली आहे.
८. वाई प्रांताचा सुभेदार येसाजी मल्हार यास निंब येथील सदानंद गोसावींच्या मठास दरसाल नेमून दिलेला ऐवज पोचता न केल्याचे कळताच संभाजी महाराजांनी '...धर्मकार्यात खलेल न करणे..अशा शब्दात ताकीद दिली आहे. व तेथील आनंदगिरी गोसावी यांना पत्र लिहून '...धर्माच्या कार्यास अंतर पडणार नाही...असे अभिवचन दिले आहे.
देहू ते पंढरपूर आषाढीवारीला संरक्षण व अर्थ पुरवठा केला
 इतर धर्मांचा मान सन्मान व आदर करणारे छत्रपती संभाजी महाराज.

प्रधान मंडळ

सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती - संभाजीराजे शिवाजीराजे भोसले 
(सेनाधीशांचे सेनाधीश - सर्वोच्च अधिकार असलेले.
श्री सखी राज्ञी जयति छत्रपती येसूबाई संभाजीराजे भोसले
 (संभाजीराजांच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी)
·         सरसेनापती - हंबीरराव मोहिते
·         छांदोगामात्य  - कवी कलश
·         पेशवे - निळो मोरेश्वर पिंगळे
·         मुख्य न्यायाधीश - प्रल्हाद निराजी
·         दानाध्यक्ष - मोरेश्वर पंडितराव
·         चिटणीस - बाळाजी आवजी
·         सुरनीस - आबाजी सोनदेव
·         डबीर - जनार्दनपंत
·         मुजुमदार - अण्णाजी दत्तो
·         वाकेनवीस - दत्ताजीपंत

औरंगजेबाची दख्खन मोहीम व इतर लढाया

औरंगजेबाचे (मोगलशाहीचे) महाराष्ट्रावरील आक्रमण

शिवाजी महाराजांच्या निधना नंतर मुगल बादशाह औरंगजेब स्वतःच स्वराज्यावर चालून आला होता.१६८० मध्ये दिल्लीचा पातशहा, औरंगजेब महाराष्ट्रावर ५ लाखाची सेना घेवून चालून आला. . औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. त्यावेळी संभाजी महाराजांचे वय फक्त २३ वर्ष होते. जगातीला सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. औरंगजेबाचा हा सेनासागर मराठ्यांच्या सैन्य संखेच्या दहा पट होता.५ लाखांचे सैन्य, १४ कोटी खजिना, ४० हजार हत्ती, ७० हजार घोडे, ३५ हजार उंट. इतका अफाट सैन्यासागर होता कि औरंगजेबाची छावणी ३ मैलांपर्यंत पसरायची.काही दिवसातच महाराष्ट्र आणि दख्खन जिंकून घेणार अशी अशा बाळगून आलेल्या या दिल्लीकराला संभाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी ७ वर्ष जुंझत ठेवला. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला.जोपर्यंत संभाजी महाराजांना कैद करणार नाही तोपर्यंत डोक्यावर मुकुट (शाही पगडी) घालणार नाही मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा होय. औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. 
By - Maratha Empire
संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.

संभाजीराजांनी गोव्यावर आक्रमण करून धर्मवेड्या पोर्तुगिजांना नमवले.  गोव्यातील पोर्तुगिजांच्या धर्मप्रसाराला संभाजीराजांनी पायबंद घातला, त्यामुळे गोवा प्रदेशातील हिंदूंचे रक्षण झाले.
  पोर्तुगीज संभाजीराजांना प्रचंड भीत असत. त्यांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे, 
 ``सध्याच्या परिस्थितीत संभाजी महाराज हेच सर्वशक्‍तीमान आहेत, असा आमचा अनुभव आहे !'' शत्रूचे हे प्रमाणपत्र महाराजांच्या सामर्थ्याविषयी कल्पना देणारे आहे.
संभाजीराजांचा जाज्वल्य धर्माभिमान !
By- lokrajya
संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठयांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली. १६८७-८८ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला.त्यामुळे परिस्थिती कठीण झाली. त्यातच संभाजीराजांच्या पाठीत खंजीर खुपसायला अनेक फितुर सदैव तत्पर होते. संभाजीराजांच्या दुर्दैवाने त्यांचे सख्खे मेहुणे-- गणोजी शिर्के, महादजी निंबाळकर आणि हरजीराजे महाडिक काही गावांच्या वतनासाठी शत्रूला सामील झाले.
औरंगजेबाचा चौथा मुलगा अकबर ह्याने जेव्हा औरंगजेबा विरुद्ध बंड केले तेव्हा त्याला संभाजी महाराजांनी आसरा दिला होता. आणि त्या दरम्यान त्यांनी अकबराची बहिण झीनत हिला एक पत्र लिहिले होते , जे औरंगजेबाच्या माणसांच्या हाती लागले आणि ते भर दरबारात औरंगजेबाला वाचून दाखवले गेले होते. ते पत्र असे होते , ' तुमचे बंधू शहजादे अकबर यांनी हिंदुस्तान सोडण्यापूर्वी आम्हाला तुमच्या बद्दल सांगितलं . तुम्ही त्यांना पत्र पाठवलं होतं . त्याचा जबाब त्यांनी तुम्हाला परत पाठवला नव्हता . तो निरोप त्यांनी जाताना आमच्याकडे देवून ठेवला आहे तो असा : बादशहा सलामत हे नुसते मुसलमानांचे बादशहा नाहीत . हिंदुस्तान रयत वेगवेगळ्या धर्माची आहे . त्या साऱ्यांचेच हजरत बादशहा आहेत . जी गोष्ट मनात ठेवून ते या दक्खनच्या पठारावर आले ती आता साध्य झाली आहे . त्यात समाधान मानून त्यांनी आता हिंदुस्तानांत परत कूच करावं . एकदा त्यांच्या तावडीतून आम्ही आणि आमचे तीर्थरूप सुखरूप सुटून आलो आहोत . पण बादशहा अशीच आपली जिद्द चालवणार असतील तर आमच्या पकडीतून मात्र ते सुटून परत हिंदुस्तानात जाणार नाहीत . त्यांची तशीच इच्छा असेल तर त्यांनी आपल्या कबरीसाठी या दक्खनमध्ये लवकरच जागा शोधलेली बरी .
 [संदर्भ:शहेनशहा , ना.स.इनामदार]

साहित्यिक संभाजीराजे

अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचा उत्तम जाणकारही होते महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला.
By- sambhaji mahara.com
बुधभूषण या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील शिवाजीराजे यांचा उल्लेख आहे :
'कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: ।
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: ॥
अर्थ-"कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा, करितो धर्माचा ऱ्हास
तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास ॥ "
याचबरोबर संभाजीराजांनी नाईकाभेदनखशिखासातसतक या तीन ग्रंथांचे लिखाण केले. 

दगाफटका

इ.स. १६८९च्या सुरुवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने गणोजी शिर्के यांच्या साथीने संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले.
By- Haribhakt
१ फेब्रुवारी १६८९ या दिवशी सख्खा मेहुणा गणोजी शिर्के याच्या फितुरीमुळे संगमेश्वर या ठिकाणी संभाजीराजे काही वतनदारांची गाऱ्हाणी ऐकत असतांना पकडले गेले. येसुबाईचे थोरले बंधू म्हणजे शंंभूराजांचे मेव्हणे गणोेजी शिर्के हिंदवी स्वाराज्याशी बेईमान-फितूर झाले. संभाजीराजे कवी कलशाचे कलाने वागतात म्हणून कलशावर पन्हाळा भागात त्यावर हल्ला चढवला, ही बातमी जेव्हा संभाजी महाराजांना कळली, तेव्हा ते लगेच शिर्क्यांचा बिमोड करण्यासाठी विशालगडावर आले. शंभूराजे चालून येत असल्याचे कळताच गणोजी शिर्के संगमेश्वर भागात पळून गेले. शिर्क्यांच्या मदतीला औरंगजेबाचे सैन्य येण्यापूर्वीच संभाजीराजांनी कवी कलश, संताजी घोरपडे, मालोजी घोरपडे, खंडोबल्लाळ चिटणीस यांच्यासह शिर्क्यांची बंडाळी मोडून काढली व त्याचा जबरदस्त पराभव केला. तिकडे झुल्पीकार खान रायगडावर चालून येत असल्याची खबर राजांना मिळाल्याने शंभूराजे सातारा-वाई-महाड मार्गे रायगडावर परतणार होते; पण मुकर्रबखान कोल्हापूरपर्यंत येऊन पोहोचल्यामुळे शंभूराजांनी संगमेश्वर मार्गाने चिपळूण-खेड मार्गे रायगडावर जाण्याचा बेत केला. शंभूराजे स्वत: संगमेश्वरी आल्याची वार्ता आसपासच्या भागात वार्‍यासारखी पसरली. शिर्क्यांच्या बंडाळीमुळे उद्ध्वस्त झालेली मंडळी आपल्या तक्रारी घेऊन संभाजीराजांकडे येऊ लागली. रयतेच्या तक्रारी समजून घेऊन त्या सोडवण्यात त्यांचा वेळ गेला आणि संगमेश्वरला ४-५ दिवसांचा मुक्काम करावा लागला. तिकडे कोल्हापूरवरून मुकर्रबखान निघून चालू येत असल्याचे राजांना कळले. कोल्हापूर ते संगमेश्वर हे अंतर ९० मैलांचे आणि तेसुद्धा सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांनी व्यापलेले अवघड वाटेचे ! त्यामुळे किमान ८-१० दिवसांच्या अंतराचे; परंतु फितूर झालेल्या गणोजी शिर्क्याने मुकर्रबखानाला जवळच्या आड वाटेने केवळ ४-५ दिवसांतच संगमेश्वरला आणले. संभाजीचा बदला घेण्याच्या उद्देशाने शिर्क्यांनी फितुरी केली होती व आपली जहागीरी प्राप्‍त करण्यासाठी त्याने हा उद्योग केला. त्यामुळे १ फेब्रुवारी १६८९ रोजी मुकर्रबखानने त्याच्या ३ हजार सेनेच्या मदतीने शंभूराजांना वेढ्यात पकडले.

 संभाजीराजांचा वेढा तोडण्याचा प्रयत्‍न-

संगमेश्वरला ज्या सरदेसाई यांच्या वाड्यात शंभूराजे मुक्कामाला होते, त्यावाड्याला खानाचा वेढा पडला, हे जेव्हा राज्यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांना आश्चर्यच वाटले; कारण इतक्या कमी दिवसांत खान येणे शक्यच नाही, हेत्यांना माहीत होते; पण ही किमया केवळ फितुरीची होती, हेसुद्धा त्यांच्या लक्षात आले. शंभूराजांनी अगोदरच आपली फौज रायगडकडे रवाना केली होती व केवळ ४००-५०० सैन्यच हाताशी ठेवले होते. याच वेळी शंभूराजांकडे कृष्णाजी चिमूलव अर्जोजी यादव हे आपल्या तक्रारी घेऊन आले होते. आता खानाचा वेढा मोडून रायगडकडे प्रयाण करणे हा एकमेव पर्याय राजांपुढे शिल्लक होता; म्हणूनराजांनी शत्रूवर तुटून पडा, असा आदेश आपल्या सैनिकांना दिला. या परिस्थितीतही न डगमगता शत्रूचा वेढा तोडून संभाजीराजे, संताजी घोरपडे वखंडोबल्लाळ रायगडच्या दिशेने वेगात निघाले. दुर्दैवाने मालोजी घोरपडे याधुमश्चक्रीत ठार झाले; पण संभाजीराजे व कवी कलश हे मात्र वेढ्यात अडकले.संभाजीराजांनी याही स्थितीत आपला घोडा वेढ्याच्या बाहेर काढला होता; पणमागे असणार्‍या कवी कलशाच्या उजव्या हाताला मुकर्रबखानाचा बाण लागून तेखाली पडल्याने त्यांना वाचवण्यासाठी राजे पुन्हा मागे वळले आणि वेढ्यात सापडले.

स्वकियांच्या बेईमानीमुळे राजांचा घात !

यावेळी अनेक सैनिक ठार झाल्यामुळे त्यांचे घोडे इतस्तत: उधळत होते सर्वत्रधुरळा उडाला होता. कोणालाच स्पष्ट दिसत नव्हते. त्याचा फायदा घेऊन शंभूराजे पुन्हा सरदेसाइंच्या वाड्यात शिरले. त्यांचा घोडा मात्र तिथेचहोता. धुरळा खाली बसल्यावर गणोजी शिर्क्यांनी शंभूराजांचा घोडा ओळखला; कारण राजांच्या घोड्याच्या पायात सोन्याचा तोडा असायचा व हे शिर्क्यांनामाहीत होते; म्हणून त्यांनी खानाच्या सेनेला संभाजींचा शोध जवळपासच घ्यावा, अशी सूचना केली. अखेर मुकर्रबखानच्या मुलाने म्हणजे इरवलासखानाने शंभूराजांना पकडले. फितुरीमुळे शेवटी सिंहाचा छावा शत्रूच्या हाती गवसला.जंग जंग पछाडूनसुद्धा सतत ९ वर्षे सात लाख सेनेच्या हाती जो सापडला नाही, बादशहाला ज्याने कधी स्वस्थता लाभू दिली नाही, असा पराक्रमी योद्धा स्वकियांच्या बेईमानीमुळे मोगलांच्या जाळयात अडकला.
सांभार :आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची
By -Facebook.com

शारीरिक छळ व मृत्यू :-

त्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला.
By-davianart.com
 औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून धिंड अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडख्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदुशकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते. गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानूसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे 'तख्तेकुलाह' म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेऊन त्याला दोन्ही हात बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन् त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती. अशी ती धिंड मोगली फौजेमधून काढलेली होती. मोगलांमध्ये ईदपेक्षाही उत्साहाचे वातावरण होते. दुतर्फा फौजेतील सैनीक महाराजांवर व कवी कलशांवर दगडे भिरकावीत होते. त्यांना भाल्याने टोचीत होते. त्यांचे नगारे वाजत होते, कर्णे थरारत होते. बारा ईमामांचे झेंडे फडकत होते.
पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे तुळापूरच्या संगमावर त्याला हिंदू राजास हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त - लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. 
By- sudrashan news
चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही डोळे काढण्यात आले.बलिष्ठ शरीर यष्टीचा एक पठाण कविराजांच्या छातीवर बसला. दोघांनी त्यांचे पाय उसाचे कांडे पिळगटावे तसे मागे खेचले. दोघांनी आपल्या राकट हातांनी कविराजांची मुंडी धरली. त्या पठाणाने कविराजांच्या जबड्यात हात घातला. कविराजांचे मुख रक्ताने भरून गेले. त्या धटींगणाने कविराजांची जीभ हाताने बाहेर खसकन खेचली. एकाने ती वीतभर लांब बाहेर आलेली जीभ कट्यारीने खचकन छाटली. कविराजांच्या तोंडातून रक्ताचा डोंब उबळला. संभाजी महाराजांचीही जीव्हा अशीच छाटली गेली. पहाणार्‍यांचेही डोळे पांढरे पडले. असूरी आनंदाने आवघी छावणी गर्जत होती. कवी कलशांवर होणारे अत्याचार ही जणू संभाजी महाराजांवर होणार्‍या अत्याचारांची रंगीत तालीमच असायची. संध्याकाळ झाली. शंभू महादेव खांबास घट्ट बांधून ठेवलेले होते. स्वाभीमानाने तळपत झळकणार्‍या तेजस्वी योग्यासारखे. ज्यांच्या तेजाने शेशही डळमळून जावा अशा तेजस्वी श्रीकृष्णासारखे. अविचल. अभेद्य ! आभाळात अभिमानाने मस्तक उंचावून बाणेदारपणे उभे असलेल्या रायगडाच्या टकमक टोकासारखे. दोन दैत्य पुढे सरसावले. एकाने पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि दुसर्‍याने समोरून गळ्यापासून शंभूराजांच्या अंगात वाघनख्या घुसवल्या. त्या राक्षसांना जोर चढावा म्हणून कुराणातील आयते वाचले जात होते. रण वाद्यांचा दणदणाट होत होता. "दीन दीन" "अल्लाहो अकबर" च्या घोषात राजांची त्वचा डाळिंबाच्या टरफला सारखी सोलली जात होती. जास्वंदीसारखा लाल बुंद देह यातनांनी तळमळत होता. रक्ता मासाच्या चिंध्या होत होत्या. संपूर्ण देहाची चाळणी झाल्यावर मग फरशा व खांडे पेलत दोन गाझी पुढे आले. त्या दोघांचेही हात पाय असे अवयव एक एक करून तोडून टाकले. एकाने खांड्याचे धारधार पाते संभाजी राजांच्या मानेत घुसवले. व हळू हळू कुराणातील आज्ञेप्रमाणे 'हलाल' करीत शिर चिरत धडावेगळे केले !!!
मार्च ११, १६८९ रोजी संभाजीराजांची शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली.


 By- mazamarathi.com

 नतमस्तक उभा महाराष्ट्र, माझ्या शभुंच्या चरणी.....राजे मुजरा, मुजरा त्या झुंजार पोलादी देहाला, तुमच्या स्वराज्याच्या अपार भक्तीला....तुमच्या जखमातून
वाहणाऱ्या रक्ताला, रागंड्या तुमच्या सहनशक्तीला..... ..
                     पुन्यवान समजतो तुम्हाला जखडलेला साखळदंड
मराठ्यांच्या ह्या शाक्तवीर,  दूरदर्शी, अविस्मरणीय

पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा!

!जय जिजाऊ जय शिवराय-जय शंभूराजे!

वयाच्या बत्तीसाव्या वर्षी छञपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी,आणि स्वाभिमानासाठी आपल्या देहाचे बलिदान करणारा शुरवीर योद्धा म्हणजे आमचा शंभुराजा****छत्रपती संभाजी राजेंच्या चरणी मानाचा त्रिवार मुजरा !*


संभाजी महाराजांविषयी ललितेतर इतिहास लेखन • छत्रपती संभाजी महाराज प्रकाशन यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते (पृष्ठसंख्या ७५०, पहिली आवृत्ती १९६०,पी.पी.एच.बुक स्ट.प्रकाशन १९७१ २री-आवृती,मनोरमा प्रकाशन ३री आवृती २००१,  लेखक: वा.सी. बेंद्रे ( इ.स.१९१८ ते इ.स.१९५८म्हणजे सुमारे ४० वर्षे अथक मेहनत करून त्यांनी अखेर १९६० मध्ये संभाजी महाराजांचे सत्य चरित्र सर्वांसमोर आणले. )
 • शिवपुत्र संभाजी - डॉ. कमल गोखले
 • ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा - डॉ. सदाशिव शिवदे
 • राजा शंभूछत्रपती - विजयराव देशमुख
 • पोर्तुगीज कागदपत्रे - डॉ.पांडुरंग पिसुर्लेकर
 • पोर्तुगेज-मराठे संबंध - डॉ.पांडुरंग पिसुर्लेकर
 • छ. संभाजी स्मारक ग्रंथ - संपादन- डॉ. जयसिंगराव पवार
 • The Portuguese and The Marathas translated by P.R. Kakodkar
 • संभाजीकालीन पत्रसार संग्रह (शा.१६०२ - शा.१६१०) : संपादक - शंकर नारायण जोशी; प्रकाशक भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे) (पहिली आवृत्ती - १९४९; नवीन आवृत्ती - ऑगस्ट २०१५)
 • छत्रपती संभाजी महाराजांची पत्रे : डॉ. सदाशिव शिवदे यांच्या या पुस्तकात छत्रपती संभाजीराजांच्या ३१५ पत्रांचा परिचय करून देण्यात आला आहे.
 • अद्वितीय छत्रपती श्रीसंभाजी महाराज (संशोधनात्मक ग्रंथ - खंड १ ते ५) - अनंत दारवटकर
 • खरा संभाजी- नामदेवराव जाधव
 • फ्रेंच-मराठा संबंध - लेखक ?
 • बिकानेर पुरालेखाभिगार - राजस्थान
 • बुधभूषण-राजनीती - संपादक : प्रा. रामकृष्ण आनंदराव कदम (कदंब), राजमयूर प्रकाशन, पुणे
 • शाक्तवीर संभाजी महाराज - ॲडव्होकेट अनंत दारवटकर
 • छावा-शिवाजी सावंत
 • संभाजी-विश्वास पाटील
 • sambhaji maharaj

संदर्भ


साचा:शिवपुत्र संभाजी - डॉ कमल गोखले

 • धर्मवीर संभाजीराजे 
 • संभाजीमहाराज.कॉम
 • छावा-शिवाजी सावंत
 • पोर्तुगीज कागदपत्रे - डॉ.पांडुरंग पिसुर्लेकर
 • खरा संभाजी- नामदेवराव जाधव
 • छ. संभाजी स्मारक ग्रंथ - संपादन- डॉ. जयसिंगराव पवार
 • सांभार :आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची
 • शहेनशहा ना.स.इनामदार
 • साभार- फोटो

============================================= 

जय शिवराय

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यानंतर वीरश्री संचारणार नाही असे होणार नाही. तुम्हालाही शिवरायांची ही कामगिरी पुढील पिढीपर्यंत जावी असे वाटत असेल तर तुम्ही शिवाजी महाराजांच्या कथा त्यांना सांगायला हव्यात. या महानायकाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यापेक्षा त्यांचा आदर्श, त्यांचे विचार शिकवून करायला हवी.एक आठवण शिवरायांची (Ak Athvan Shivrayanchiया पेजच्या माध्यमातून आपण शिवाजी महाराजांचे विचार आणि इतिहास जनसामन्यात तळागाळापर्यंत पोहोचणे हेच आपले ध्येय.

shivaji maharaj chhatrapati shivaji maharaj

जय जिजाऊ जय शिवराय  छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले