छत्रपती

[एक आठवण शिवरायांची][bsummary]

किल्ले

[गड किल्ले][bigposts]

रणझुंजार मावळे

[वीर मावळे][twocolumns]

पुरंदरचा तह


पुरंदरचा तह,एक आठवण शिवरायांची ,chatrapati shivaji maharaj

इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून छत्रपती शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले.छत्रपती शिवाजी महाराजांसाठी परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे वडील शहाजीराजे कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता.
महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले,या पुरंदर किल्ल्याच्या आश्रयाने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली.  छत्रपती शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन इ.स.१६५५ मध्ये छत्रपती शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १४ मे इ.स.१६५७ गुरुवार या दिवशी छत्रपती संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला

सुरतेवर छापा :-

chhatrapati shivaji bhosle,

 या विजयांनंतर शिवराय स्वस्थ बसले नाहीत. औरंगजेब बादशहाच्या सेना महाराष्ट्रात धुमाकुळ घालत होत्या, तेव्हा बादशहावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला.कुठे पुणे व कुठे सुरत? सुरत म्हणजे त्या वेळीची मुघली मुलाखतील मोठी व्यापारपेठ. खुप सधन. शिवरायांनी सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयाची लुट मिळवली. सुरतेच्या लुटीत शिवरायांनी नीती सोडली नाही. चर्च अथवा मशीदी यांना हात लावला नाही.

पुरंदरचा वेढा व तह :- 


शाहिस्तेखानाच्या पराभवाने, सुरतेच्या लुटीने, जसवन्तसिंहाच्या पराभवाने औरंगजेबाचा संताप वाढत होता.सत्तर हजारांची सेना घेऊन शाहिस्तेखान गेला व बोटे गमावून माघारी आला. दिल्लीसम्राटांची व्यापारपेठ सुरत बघता बघता लुटली गेली.शिवाजीराजांचा असाच उद्योग चालू राहिला तर मोगलाई संपुष्टात  आल्याखेरीज राहणार नाही हे औरंगजेबाने ओळखले. शिवाजी राजांचे पारिपत्य करण्यासाठी त्याने आपल्या दरबारचा सर्वश्रेष्ठ सरदार निवडला. मिर्झाराजा जयसिंह ऐंशी हजार स्वार, बरोबरी दिलेरखान, पाच हजार पठान घेऊन शिवाजीचे पारिपत्य करण्यासाठी निघाला. मिर्झाराजांनी पुरन्दरला वेढा घातला. दिलेरखानाने वज्रगडाचा ताबा घेतला. वज्रगडावरून पुरन्दरवर तोफांचा मारा सुरु करण्यात आला. तोफांच्या हल्ल्याने पुरन्दरच्या खिण्डार पडले. मोगल सेनेने किल्ल्यात प्रवेश केला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरन्दरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंहाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला.



यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. त्यांची नावे अशी,


१. अंकोला
२. कर्नाळा
३. कोण्ढाणा (सिंहगड)
४ कोहोज
५. खिरदुर्ग (सागरगड)
६. तिकोना
७. तुंग
८. नंगगड
९. नरदुर्ग
१०. पळसगड
११. किल्ले पुरन्दर
१२. प्रबळगड - मुरंजन
१३. भण्डारगड
१४. मनरंजन
१५. मानगड
१६. मार्गगड
१७. माहुलीगड
१८. रुद्रमाळ
१९. रोहिडा
२०. लोहगड
२१. वसन्तगड
२२. विसापूर
२३. सोनगड

पुरंदरच्या तहाचे परिणाम :-

  • या तहानुसार राजांनी आपले तेवीस किल्ले व चार लाख होनांचे क्षेत्र बादशहाला दिले.
  • राजांच्या ताब्यात बारा किल्ले आणि लाख होनांचे क्षेत्र राहिले.
  • मिर्झाराजांनी चाळीस लाखांची खण्डणी राजांवर लादली.वार्षिक तीन लाखांचे हप्ते ठरले.
  • संभाजी राजांना बादशहाकडून पाच हजाराची मनसब मिळाली.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
-एक आठवण शिवरायांची 
chatrapati shivaji maharaj
statue of chhatrapati shivaji maharaj
maratha empire history





1 comment:

जय शिवराय
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यानंतर वीरश्री संचारणार नाही असे होणार नाही. तुम्हालाही शिवरायांची ही कामगिरी पुढील पिढीपर्यंत जावी असे वाटत असेल तर तुम्ही शिवाजी महाराजांच्या कथा त्यांना सांगायला हव्यात. या महानायकाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यापेक्षा त्यांचा आदर्श, त्यांचे विचार शिकवून करायला हवी.
या पेजच्या माध्यमातून आपण शिवाजी महाराजांचे विचार आणि इतिहास जनसामन्यात तळागाळापर्यंत पोहोचणे हेच आपले ध्येय.

जय जिजाऊ जय शिवराय