छत्रपती

[एक आठवण शिवरायांची][bsummary]

किल्ले

[गड किल्ले][bigposts]

रणझुंजार मावळे

[वीर मावळे][twocolumns]

वीर शिवा काशिद

वीर शिवा काशिद 

पन्हाळगडाला "सिद्दी मसूद" याने घातलेल्या वेढ्यातून निसटण्यासाठी "शिवा काशिद" नावाचा मावळा हा छत्रपती शिवरायांचा पेहराव करून पालखीतून निघाला.
पण तो पकडला गेला आणि ठार झाला. नावाने "शिवा काशिद" असणारा हा मावळा मरताना "शिवाजी राजा" म्हणून मारला गेला. यासारखं मोठ भाग्य ते काय!    धन्य तो  "वीर शिवा काशिद". 
१२ जुलै १६६० ची रात्र होती.  दोन पालख्या तयार केल्या. शिवा काशीद निर्धाराने एका पालखीत आणि शिवराय दुसऱ्या पालखीत बसले. शिवरायांची पालखी अडचणीच्या वाटेने निघाली आणि शिवा काशीदची पालखी पन्हाळगडाच्या मुख्य दाराने निघाली. शिवराय निसटले, अशी ओरड होताच जौहरच्या सैनिकांनी रातोरात शोधाशोध सुरू केली. त्यांना एक पालखी पळविताना दिसली. त्या पालखीला पकडले व पडदा बाजूला केला. शिवा काशीद हा हुबेहुब शिवरायासारखा दिसत होता.
     त्यामुळे सिद्दि जोहरला वाटले कि हाच शिवाजी ! म्हणुन त्याने व त्याच्या सरदारांनी शिवा काशीदला पकडले व हे शिवराय नाहीत असे कळताच जोहर म्हणतो कसा ‘शिवा काशीद आता तु मरणाला तयार हो’.ते ऐकुन शिवा काशीद म्हणाला ‘शिवाजीराजे आता सुखरुप् वेढयातुन सुटले असतील. आता मी सुखाने मरण्यास तयार आहे’.तसेच शिवरायासाठी हजारदा मरण्यास मी सुखाने तयार आहे’. हे ऐकुन जोहरने त्याचे शिर कापुन टाकले आत शिवा काशीद पालखीचा गोंडा धरून रुबाबात बसलेला. मात्र, ते शिवराय नसून शिवा काशीद आहे हे लक्षात येताच सिद्दी जौहरने शिवा काशीदच्या छातीत समशेर खुपसली. स्वराज्यासाठी शिवा काशीद यांनी असे अतुलनीय बलिदान केले. वीर शिवाजी काशीद यांना त्रिवार मानाचा मुजरा...