छत्रपती

[एक आठवण शिवरायांची][bsummary]

किल्ले

[गड किल्ले][bigposts]

रणझुंजार मावळे

[वीर मावळे][twocolumns]

जय शंभुराजे परिवारातर्फे किल्ले परांडा स्वच्छता मोहिम पार..

जय शंभुराजे परिवारातर्फे किल्ले परांडा स्वच्छता मोहिम पार..._*


     *_जय शंभुराजे परिवार महाराष्ट्र राज्य तर्फे प्रत्येक जिल्ह्यात विभागीय मोहिम सुरू आहेत आणि त्यात आज किल्ले परांडा येथे सोलापूर व धाराशिव (उस्मानाबाद) यांची विभागीय मोहिम गडाचे बुरूज, तटबंदी, भिंत अशांवरती कामे करत पार पडली.
        *_गडकोट हे महाराष्ट्राचे वैभव आहेत आणि आपण त्याला जपलेच पाहिजे, सध्या काही ठिकाणी गडकोटांची अवस्था फार बिकट आहे त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व तरूण पिढीची फार गरज आहे, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी, मावळ्यांनी ज्या स्वराज्यासाठी, गडकोटांसाठी लढले आणि आपला अधिकार स्वतः मिळवूनही घेतला हे सर्व लक्षात घेऊन तरूण पिढी गडकोटांकडे लक्ष द्यावी अस आवाहन "जय शंभुराजे परिवारातर्फे करण्यात आले, तसेच सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या तर्फे पण खुप मदत झाली..._*
      *_मोहिमेत सहभागी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, बार्शी तालुकाध्यक्ष वैभव काळदाते, करमळा तालुकाध्यक्ष ओमकार जाधव,विशाल सांगडे करमाळा ता.उपाध्यक्ष आनिकेत वळेकर, धाराशिव (उस्मानाबाद) अध्यक्ष सौरभ लोमटे, प्रशांत शेलार, सह्याद्री प्रतिष्ठान चे अमर केंढारे तसेच सर्व ७० मावळ्यांनी सहभाग घेतला होता._*