छत्रपती

[एक आठवण शिवरायांची][bsummary]

किल्ले

[गड किल्ले][bigposts]

रणझुंजार मावळे

[वीर मावळे][twocolumns]

गडदुर्गा “अंकाईदेवी माता”

अहमदनगर कडून शिर्डी-येवला मार्गे मनमाडला राज्यमार्ग जातो या मार्गावर येवला आणि मनमाडच्या मधे जोडकिल्ले “अंकाई टंकाई”...

अंकाई टंकाई या जोडदुर्गा मधील अंकाईचा दुर्ग महत्त्वाचा आहे तसा टंकाई हा दुय्यम दुर्ग आहे मुख्य किल्ल्या जवळ असलेला दुसरा डोंगर हा मुख्य किल्ल्याला बाधक ठरु शकतो म्हणून तो डोंगर शत्रूच्या ताब्यात जाता कामा नये म्हणून तो दुर्गम करण्यात येतो अथवा त्यालाही तटबंदीचे शेलापागोटे चढवण्यात येऊन मुख्य किल्ल्यामध्ये समाविष्ठ करण्यात येतो त्यामुळे टंकाई हा अंकाईचा जोडदुर्ग झालेला आहे या जोडदुर्गांना जोडणाऱ्या खिंडीलाच बंदिस्त केल्यामुळे टंकाईचा प्रवेशमार्ग अंकाईच्या कह्यात आलेला आहे...

गडदुर्गा “अंकाईदेवी माता”....🚩

अंकाई डोंगरावर अगस्ती ऋषींचा आश्रम होता किल्लावर असलेली ब्राम्हणी (हिंदु) लेणी आणि किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली दहाव्या ते बाराव्या शतकातील जैन लेणी किल्ल्याच प्राचीनत्व सिध्द करतात या किल्ल्याची निर्मिती बाराव्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या कारकीर्दीत झाली अस मानल जात इ.स १६३५ मधे मुघलांनी हा किल्ला लाच देऊन जिंकून घेतला सुरत-औरंगाबाद या व्यापारी मार्गावरचा हा महत्वाचा किल्ला असल्यामुळे मुघलांच्या दृष्टीने हा महत्वाचा किल्ला होता मुघलांकडुन हा किल्ला निजामाकडे गेला इ.स १७५२ मधे भालकीच्या तहा नुसार हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला इ.स १८१८ मधे इंग्रजांनी हा किल्ला जिंकुन घेतला...

“तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची काया
तुझ्या दयेचा ओघ अखंडीत, दुरित लयाला नेई....”

#जागर_स्त्रीशक्तीचा...