छत्रपती

[एक आठवण शिवरायांची][bsummary]

किल्ले

[गड किल्ले][bigposts]

रणझुंजार मावळे

[वीर मावळे][twocolumns]

सह्याद्री मस्तक दुर्ग साल्हेर वरील गडदुर्गा “रेणुका माता”...


 *मराठ्यांची एक अपूर्व शौर्यगाथा* ज्या ठिकाणी घडल्‍या त्या ठिकाणांमध्ये साल्हेर किल्ल्याचं नाव घेतलं जातं  साल्हेर किल्ल्याचं महत्त्व बहामनी राजवट आणि त्या पूर्वीपासून अबाधित राहिलं आहे त्याचं स्थान गुजरात आणि बागलाण या प्रांतांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर असल्यान छत्रपती  शिवाजी महाराजांनी सुद्धा त्याचं महत्त्व ओळखलं नसतं तरच नवल त्या मुळेच महाराजांनी १६७० मध्ये सुरतेच्या लुटीच्या वेळी परतताना *साल्हेरचा किल्ला* जिंकून घेतला...

 *सह्याद्री मस्तक दुर्ग साल्हेर वरील गडदुर्गा “रेणुका माता”....* 🙏🚩


शिवकाळात या देवदेवतांची पूजा तिन्ही त्रिकाळ करण्यासाठी पुजारी नेमला जात असे नऊरात्रातील नऊ दिवस गडावर मोठी धामधूम असे दसरा येण्याअगोदर गडावरील तणकट, झाडोरा, गवत काढून गड नाहता केला जात असे मूर्तीवर शेंदूर चढवला जात असे मंदिराच्या छताची शाकारणी होत असे त्यामुळे साहजिकच दसर्‍या अगोदरची गडावरची धामधूम अनुभवण्यासारखी असे या काळात भजन किर्तन, आरत्या यांनी मंदिर परिसर दणाणून जात गड पुन्हा नव्याने जणू जिवंत होत असे विजयादशमीला गुळवणी पोळ्याचे जेवण व खंडेनवमीला शस्त्रपूजा  करून मांसाहारी जेवण हा प्रघातच असत देवीची पालखीतून छबिन्याची मिरवणूक, त्या मिरवणुकीपुढे मर्दानी खेळ, लेझीम, ढोल ताशे, हलगी घुमक्या व झांजा वाजवून सण साजरा होत असे असा हा गडावरील दसरा अनुभवण्याची गोष्ट होती....