छत्रपती

[एक आठवण शिवरायांची][bsummary]

किल्ले

[गड किल्ले][bigposts]

रणझुंजार मावळे

[वीर मावळे][twocolumns]

सह्यादीचा राजा आज समीनदरावर स्वार झाला

 "सह्यादीचा राजा आज समीनदरावर स्वार झाला ”


                                      भारतीय_नौदल _दिन                           

“जमिन पण गेली आता, समुद्र पण जाणार "
-पोर्तुगीज.
मध्ययुगीन कालखंडात कोकण किनारपट्टीवर आरमार दलाची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी २७ व्या वर्षी आरमार स्थापून एक नवे सागरी राज्यच उभे केले होते .
भारतीय आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखले जाते.
शिवरायांच्या पूर्वीही हजारो वर्षांपासून आपल्याकडे आरमार होते मात्र त्यानंतर काही कारणांमुळे भारतात आरमाराचा वापर पूर्णपणे बंद झाला.
एवढेच काय तर समुद्र उल्लंघायला देखील बंदी करण्यात आली. याचा फायदा* *पोर्तुगीज-इंग्रज-डच-फ्रेंच-सिद्दी यांनी उठविला आणि आपल्याला अनेक वर्षे गुलामगिरीत काढावी लागली.
त्यावेळचे बलाढ्य सम्राट मोगल-आदिलशाह-निजामशहा-कुतुबशाह इ. यांनीदेखील प्रबळ असे लढाऊ आरमार उभारण्याचा साधा विचारही केला नाही.
मात्र शिवाजी महाराजांनी कोकणाचा मुलुख ताब्यात आल्यानंतर तेथील समुद्र पाहून, सिद्दी व युरोपियनांच्या उचापती पाहून लढाऊ आरमार उभे केले.