छत्रपती

[एक आठवण शिवरायांची][bsummary]

किल्ले

[गड किल्ले][bigposts]

रणझुंजार मावळे

[वीर मावळे][twocolumns]

राजधोर

किल्ले राजधोर 

या वाटेवरून थोडे पुढे गेल्यावर एक कातळात खोदलेली गुहा लागते.या गुहेत उतरण्यासाठी एक शिडी लावलेली आहे.येथे सध्या एका बाबांचे वास्तव्य असते.गुहेच्या वरच्या भागावर एक घुमटाकार कमान असलेली विहिर आहे.येथून परत थोडे पुढे गेल्यावर आणखी एक गुहा लागते.या गुहे समोरून पुढे जाणारी वाट तलावापाशी घेऊन जाते.तलावाच्या काठावर एका गुहेत महादेवाचे मंदिर आहे. तलावाच्या कडेकडेने जाणाऱ्या वाटेने आपण डोंगरमाथ्यावर पोहोचतो.वाटेत अनेक भुयारी टाकी आढळतात.गडाच्या सर्वोच्च माथ्यावर एक तलाव आहे.गडमाथ्यावरून मांगी तुंगी, न्हावीगड, कोळधेर, इंद्राई,धोडप असा सर्व परिसर दिसतो.गडमाथा फिरण्यास २ तास पुरतात.