छत्रपती

[एक आठवण शिवरायांची][bsummary]

किल्ले

[गड किल्ले][bigposts]

रणझुंजार मावळे

[वीर मावळे][twocolumns]

मराठ्यांचे घोडदळ

मराठ्यांचा इतिहास हा घोडदळाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य पूर्णतः घोडदळाच्याच पायावर उभे होते. 
मराठ्यांच्या फौजेंत पायदळापेक्षां घोडदळाचा भरणा जास्त असे.
सावकाश धिमेपणानें लढत बसण्याची रीत मराठ्यांनां माहीत नसल्यानें, गनिमी काव्याच्या त्यांच्या लढाईंत घोड्यांचा विशेष उपयोग होई.
मराठ्यांच्या घोडदळांत बारगीर व शिलेदार असे दोन प्रकार असत.
पहिल्यास पागा असें म्हणत.
त्याची व्यवस्था सरकारकडून होई.
शिलेदारानें स्वत:चें घोडें बाळगून त्याचा खर्च पदरचा करावयाचा असे, त्याला सरकारांतून याबद्दल जादा वेतन मिळे, हें शिलेदारांचें घोडदळ पागेप्रमाणें सरकारच्या पूर्णपणें ताब्यांत नसे. त्यामुळें असें पथक फार मोठें बाळगावें अशीं साहजिकच इच्छा होत नसे, पण त्या काळीं शिलेदारांची संख्या फार असल्याकारणानें सैन्यभरतीकरितां त्यांनां कांहीं अटींवर ठेवणें प्राप्त होई. हत्यारांच्या मानाने घोडा अत्यंत महाग विकत मिळत असल्याकारणाने अटी-तटीच्या लढाईत सैनिक आपल्या स्वतःच्या मालकीचा घोडा शत्रूच्या अंगावर घालण्यास घाबरत.
ह्यात घोडा जखमी होण्याची किंवा मारला जाण्याची भीती असे. 
अशामुळे युद्ध हरण्याचीच स्थिती उत्पन्न होत असे त्यामुळे युद्धात स्वतःचा घोडा वापरायची परवानगी नसे.
घोडा सरकार मधून मिळत असे.
सरकारी घोड्यांच्या टीरीवर ( Hips)  खुणेकरितां चौकोनी शिक्के मारीत. 
पंचवीस बारगीर किंवा शिलेदार यांवर एक हवालदार, 
पांच हवालदारांवर एक जुमलेदार, 
पांच जुमलेदारांवर एक सुभेदार 
व दहा सुभेदारांवर एक पंचहजारी असे. 
या सर्वांवर एक सरनोबत (घोडदळाचा) नेमलेला असे. 
पंचवीस घोड्यांस एक पखाली व नालबंद असे. 
(पखाली म्हणजे घोड्यांना पाणी पाजनारा.
पूर्वी चामड्याच्या मोठ्या पिशवीत पाणी साठवत. तेंव्हाची वॉटर बॅग…) 
घोडदळांतील बारगिरास दोनपासून पांच होनापर्यंत पगार असे; शिलेदारास सहापासून बारापर्यंत, जुमलेदारास वीस होन, सुभेदारास वर्षास एक हजार तैनात व पालखी असे. पंचहजारीस वर्षाची दोन हजार होन तैनात, शिवाय पालखी व अबदागीर यांची नेमणूक असे. शिलेदारांचे सुभेदार निराळे व बारगिरांचे निराळें असत. या लष्कराशिवाय शिवाजीराजांच्या स्वारीबरोबर 'जिलबीचे' पांच हजार स्वार असत. म्हणजे राजाच्या पुढे चालणारे स्वार. 'जिलबीचे' हा चुकीचा उच्चार आहे. खरा शब्द हा 'जिलू आमदन' म्हणजे राजाच्या पुढे चालणारे स्वार असा आहे.
.
.
.