छत्रपती

[एक आठवण शिवरायांची][bsummary]

किल्ले

[गड किल्ले][bigposts]

रणझुंजार मावळे

[वीर मावळे][twocolumns]

गडदुर्गा “माहूरची रेणुकामाता”..

*🔰नांदेड जिल्ह्यात माहूरगडाची गडदुर्गा “माहूरची रेणुकामाता”....🙏🚩*

*सह्याद्रीच्या शिखरावर वसलेले रेणुकामातेचे माहूर हे स्थान म्हणजे धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक स्थळांसोबतच निसर्गाचे वरदान लाभलेला प्रदेश आहे देव, सिद्ध,ऋषी यांचे निवास असलेल्या भागीरथीच्या तीरावार कान्यकुब्ज नावाची प्रसिद्ध नगरी होती...*

*त्या नगरीत धार्मिक सत्यवादी व सर्व शास्त्रांत प्रवीण असलेला इश्वाकू नावाचा राजा होता व इश्वाकू राजाच्या सद्गुणी मुलीचे नाव होते रेणू..रेणू राजाने कन्याप्राप्तीसाठी शंकराची आराधना केली...*

*शंकरपार्वतीला प्रसन्न करून त्यांच्या आशीर्वादाने कन्याप्राप्तीसाठी यज्ञ केला त्या यज्ञातून जी तेजस्विनी चंद्रिबबाप्रमाणे कन्या प्रगटली तीच एकवीरा अदिती म्हणजेच श्री रेणुका..रेणुकेचे आणखीन एक रूप प्रगट होते आणि ते म्हणजे ‘लज्जागौरी’चे...*

*महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी रेणुकामातेचे हे मूळ पीठ अतिशय शुचिर्भूत भूमी श्री क्षेत्र माहूरगडची कोरी भूमी आहे.. रेणुकेलाच मातंगी हेसुद्धा नाव आहे विष्णुरूप परशुरामाची माता व जगन्माता शिवपत्नी अनादी अनंत आहे व रेणुका हे तिचेच रूप आहे.. म्हणून श्री रेणुकेच्या रूपात शाक्त आणि वैष्णव या दोन्ही पंथांचा समन्वय आहे अशा तऱ्हेने समाजास आदर्श वाटणारे श्री रेणुकेचे महात्म्य आहे...*

*शके १६९७ मध्ये लिहिल्या गेलेल्या ’श्री रेणुका महात्म्यम्’ या प्राचीन अप्रकाशित संस्कृत ग्रंथातील श्री रेणुकेचे महात्म्य आणि महत्त्व श्री रेणुकेचे महात्म्य जाणून घेताना सामाजिक जीवनातील त्याचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते माहूर हा महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे...*

*“तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची काया*
*तुझ्या दयेचा ओघ अखंडीत, दुरित लयाला नेई....”*

*#जागर_आदिशक्तीचा...*
➖➖➖➖➖➖➖➖➖