छत्रपती

[एक आठवण शिवरायांची][bsummary]

किल्ले

[गड किल्ले][bigposts]

रणझुंजार मावळे

[वीर मावळे][twocolumns]

श्री शहाजी छत्रपती महाराज म्युझियम, नवीन राजवाडा

*श्री शहाजी छत्रपती* *म्युझियम, नवीन राजवाडा* 


 *संस्थानांचे विलीनीकरण* *झाल्यानंतर भारतातील इतर राजेरजवाड्यांनी आपल्या* *राजवाड्यांमध्ये हॉटेल्स सुरु केली. साधारणतः १९७० च्या* *सुमारास अशी योजना छत्रपतिंपुढेही मांडण्यात आली पण  छत्रपतींच्या* *राजवाड्यात हॉटेल सुरु करण्याची कल्पनाही शहाजी* *महाराजांना सहन झाली नाही. राजवाड्याची काहीतरी* *चांगली व्यवस्था करण्याचा विचार महाराजांच्या मनात* *वारंवार घोळत होता. शिवाय आपल्याकडे असणाऱ्या* *मौल्यवान ऐतिहासिक दुर्मिळ वस्तू पडून राहण्यापेक्षा* *लोकांना पाहण्यासाठी ठेवाव्यात जेणेकरुन* *छत्रपतींचा इतिहास, त्यांचे वैभव व त्यांची आठवण* *जनतेमध्ये सदैव राहील, हाही एक विचार महाराजांच्या* *मनात होता.* 

 *या सर्वांतून पूर्ण विचारांती* *महाराजांनी १९७१ साली* *"श्री शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्ट"ची स्थापना* *करुन नवीन राजवाड्याचा बराचसा भाग म्युझियममध्ये* *रुपांतरीत करण्याचा निर्धार केला. नंतर काही इमारती,* *शेअर्स व गुंतवणुकी वगैरे देऊन ट्रस्टच्या दैनंदिन* *खर्चाची तरतूदही केली. त्याचबरोबर छत्रपतींच्या* *संग्रही असलेल्या मौल्यवान ऐतिहासिक वस्तू, राजचिन्हे,* *दागिने, चांदीची अंबारी व हौदा, जुनी शस्त्रास्त्रे, पेंटींग्ज* *अशा कोट्यवधी रुपये* *किंमतीच्या वस्तू* *म्युझियममध्ये ठेवण्यासाठी* *देणगीस्वरुपात दिल्या. म्युझियमची मांडणी स्वतः* *महाराजांच्या* *मार्गदर्शनाखाली केलेली* *आहे.* 

 *महाराज दररोज दोन-तीन* *तास म्युझियममध्ये खर्च करु लागले. म्युझियममध्ये* *असणारी चांदीची अंबारी बसलेल्या हत्तीवर ठेवण्याची* *कल्पना महाराजांचीच होती. शस्त्रास्त्र विभाग व शिकार* *दालनाच्या मांडणीमध्ये महाराजांनी विशेष लक्ष* *घातले होते. शस्त्रास्त्र दालनात लावण्यात आलेल्या* *तलवारी, बंदूकांचे डिझाईन स्वतः महाराजांनी केले होते.* *राजवाड्याचे कोणतेही आर्किटेक्चर न तोडता आहे* *त्या जागेचाच उपयोग झाला पाहिजे हा महाराजांचा* *आग्रह होता. त्यानुसार विना तोडफोड वस्तूंचे योग्यप्रकारे* *प्रदर्शन करण्यासाठी स्वतः महाराजांनी अनेक तज्ञांचा* *सल्ला घेतला. आपल्या व आपल्या सहकाऱ्यांच्या* *कल्पकतेचा पूर्ण कस लावून हे ऐतिहासिक म्युझियम इतर* *म्युझियम्सपेक्षा वेगळे असावे या हेतूने महाराज रात्रंदिवस* *त्याचा विचार करायचे व त्यात ते पूर्ण यशस्वी झाले.* 


 *या म्युझियममध्ये राजघराण्यातील मेणा* , *चांदीची अंबारी, चांदीचा हौदा, हत्ती व घोड्यांचे* *दागिणे, वैशिष्टपूर्ण फर्निचर, छत्रपती घराण्याचा* *वंशपरंपरागत पाळणा, शाहू महाराजांच्या वापरातील* *वस्तू, राजघराण्यांच्या वंशावळी, छत्रपतींच्या* *जीवनावरील मौल्यवान ऐतिहासिक पेंटींग्ज,* *सोन्याच्या बंदुका, प्रिन्स अॉफ वेल्सची तलवार,* *वैशिष्ट्यपूर्ण शस्त्रास्त्रे, साठमारीची हत्यारे,* *कलाकुसरीच्या वस्तू असे अनेक मौल्यवान वस्तू* *जनतेला पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत.* 


 *म्युझियममधील सर्वात प्रेक्षणीय विभाग म्हणजे* *शिकार दालन ! छत्रपतींनी शिकार केलेले वेगवेगळे पशू* *पेंढा भरुन या दालनामध्ये ठेवण्यात आलेले आहेत.* *सिंह, वाघ, गेंडा, अस्वल, काळा चित्ता, तरस हरीण* *अशा प्राण्यांच्या शरीरात पेंढा भरुन ते योग्यरित्या जतन* *करण्यात आले आहेत. याशिवाय, गवारेडा, वाघ,* *सिंह आशा प्राण्यांची शिल्डवर लावलेली* *डोकीसुद्धा पाहणाऱ्याला शिकाऱ्याचा "फील" देतात.* *पेंढा भरुन ठेवलेल्या प्राण्यांचे जतन करण्यासाठी काचेची* *कपाटे बनवून त्यामध्ये नैसर्गिक वातावरण निर्माण* *करण्यात आले आहे त्यामुळे ते पशू सजीव वाटतात.* 
 *या म्युझियमची उभारणी करुन महाराजांनी खूप मोठे* *कार्य केले आहे. देश-विदेशातून येणाऱ्या* *पर्यटकांचे नवीन राजवाडा व म्युझियम प्रमुख आकर्षण* *आहे. महाराष्ट्रातून शालेय सहली राजवाड्यास व* *म्युझियमला भेट देत* *असतात. त्यामुळे मुलांना* *छत्रपतींच्या घराण्याचे व* *इतिहासाचे ज्ञान आपोआपच* *होते. या म्युझियमला कित्येक* *मान्यवरांनी भेट देऊन प्रशंसा* *केली आहे. महाराष्ट्र* *शासनाच्या फिल्म* *डिव्हीजनने या म्युझियमची* *व राजवाड्याची डॉक्युमेंटरी* *तयार केली आहे. हे* *नाविन्यपूर्ण वस्तूंचे प्रेक्षणीय* *म्युझियम म्हणजे छत्रपती* *शहाजी महाराजांचे चिरंतन* *स्मारकच होय !*