छत्रपती

[एक आठवण शिवरायांची][bsummary]

किल्ले

[गड किल्ले][bigposts]

रणझुंजार मावळे

[वीर मावळे][twocolumns]

रंग किल्ले “ *राजगडाचे* ”.....🚩

रंग किल्ले “ *राजगडाचे* ”.....🚩


घाणेकर सरांचे डोंगरभाऊ म्हणतात की....,
“राजगडाचे वर्षाऋतूंतील दर्शन विराट असतं भावतालचं पोपटी लावण्य पाहून काळ्याकभिन्न पत्थरालाही अशावेळी पाझर फुटलेला असतो.. इथं घटकाभर बसावं समोर पसरलेलं हिरवंगार सौंदर्य न्याहाळावं कधी धुक्याचा अथांग सागर पहावा त्याच साम्राज्य अवलोकाव कधी उसळणाऱ्या बुलंद फेसाळ लाटांच आक्रमण बघावं कधी वाऱ्याच्या सुसाटगिरीचं तांडव डोळ्यात साठवावं कधी निळसर हिरवं आधरीय परिधान करून पांढरशुभ्र उत्तरीय रुळणाऱ्या दूरवरच्या पर्वतराजांचा दिमाख जणू राजगडाचे मांडलिक वाटावेत असा त्यांचा आविर्भाव कधी उन्हापावसांचा लपंडाव निरखावा आणि मग पाचूच्या हिरव्या माहेरी आलेल्या हळदीच्या उन्हात अगदी मानमुरात न्हाऊन घ्यावं...” 

🚩🚩मुजरा राजियांचा गड राजगड व राजगडचा देव रणधुरंधर भोसले श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना🚩🚩