भीमा नदीच्या तीरी वसलेल बहादूरगड किल्ल्यामधील “बालेश्वर आणि लक्ष्मीनारायण मंदिर”...
भीमा नदीच्या तीरी वसलेल बहादूरगड किल्ल्यामधील “बालेश्वर आणि लक्ष्मीनारायण मंदिर”...🚩
हे मंदिर श्रीगोंदा पेडगाव तालुक्यात आहे...
बाळेश्वर हे महादेवाचे मंदिर आहे येथे गर्भगृह, अंतराळ आणि महामंडप आहे हे मंदिर लक्ष्मीनारायण मंदिराच्या पश्चिमेला स्थित असून पूर्वाभिमुख आहे मंदिर १२ व्या, १३व्या शतका मध्ये बांधले गेले आहे सध्या मंदिर शिखर नसलेल्या पण खांबांनी वेढलेल्या मोकळ्या जागे सारख्या अवस्थेत आहे सभागृहाचे खांब सुरेख रचनांनी कोरलेले आहेत मुख्यद्वार फुले आणि भूमितीय आकृत्यांनी सुशोभित केलेले आहे मंदिराच्या बाह्य भिंती देवदेवतांची प्रतिमांनी सुंदर रूपाने कोरलेले आहेत...
लक्ष्मीनारायण मंदिर इ.स १६८९ मुगलांनी पेडगाव एक महत्वाचे ठाणे बनवलेले होते ११-१२ व्या शतकातील चार मंदिराचे लक्ष्मीनारायण, बालेश्वर, मल्लिकार्जुन किंवा मुंडेश्वर आणि भैरवनाथ अवशेष सुरक्षित ठेवणे बाबत सूचित केले लक्ष्मीनारायण, बालेश्वर मंदिर भीमा नदीच्या डाव्या किनार्यावर वसलेले आहेत लक्ष्मीनारायण मंदिर हे एकसमान आकाराचे आणि सुंदर शिल्पकृतींनी बनवलेले आहे येथे गर्भगृह, अंतराळ, मुख्यमंडप आणि महामंडप आहे महामंडपाला पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशेने प्रवेशद्वार आहेत मंदिराच्या बाहेरील पृष्ठभागावर शिव, विष्णु आणि अष्टदिकपाळ यांच्या विविध प्रकारची शिल्पे कोरलेली आहेत मंदिरातील खांबांवर झाडाच्या पानाफुलांच्या आकृत्यांनी सुशोभित केलेली आहेत.
Labels:
गड किल्ले