छत्रपती

[एक आठवण शिवरायांची][bsummary]

किल्ले

[गड किल्ले][bigposts]

रणझुंजार मावळे

[वीर मावळे][twocolumns]

छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती

छत्रपती शिवाजी महाराजांचे  सरसेनापती 

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत एकूण ४ सरनौबत म्हणजेच सरसेनापती नेमले.

• माणकोजी दहातोंडे (१६४०-१६५७) - माणकोजी हे शहाजीराज्यांच्या काळापासून भोसल्यांच्या सेवेत होते व बाळ शिवाजीराज्यांसोबतच बंगळुरहुन पुण्यास आले. हे पुढे आज्ञेचे पालन करत नव्हते म्हणून त्यांचा चौरंगा करून मग त्यांना देहांत शासन केल्याचा कागद नुकताच पुण्यास सापडला आहे.

• नेतोजी पालकर (१६५७-१६६५) - नेतोजी यांची कीर्ती प्रति शिवाजी अशीच होती. नेतोजीने अनेकदा पराक्रम गाजवून शत्रूस हैराण केले होते, १६६२ मध्ये त्यांनी थेट मुघलांच्या औरंगाबादपर्यंत धडक मारली होती. अफजलखान प्रसंगी व पुढे पुरंदरच्या वेढ्याच्या वेळी सैन्याची वेळेवर मदत न केल्याने महाराजांनी त्यांना पदच्युत केले. ते आदिलशाही व नंतर मोगलाईत गेले जेथे त्यांना बाटवून त्यांचे मुहम्मद कुलिखान नामकरण झाले. नेतोजी पुन्हा शिवछत्रपतींच्या काळात १६७६ मध्ये स्वराज्यात आले आणि हिंदूही झाले पण सम्भाजी महाराजांच्या कारकिर्दीत ते मोगलाईत परतल्याचे अनेक इतिहासकार सांगतात.

• कुडतोजी उर्फ प्रतापराव गुजर (१६६५-१६७४) - यांच्या शौर्यावर खुश होऊन महाराजांनी यांना प्रतापराव ही पदवी दिली होती. हे शम्भूराज्यांसोबत औरंगाबाद येथे काही काळ होते. यांनी युद्धात आदिलशाही वजीर बहलोलखान यास पकडले पण नंतर दया दाखवून सोडून दिले ज्यामुळे महाराजांनी त्यांची कडक शब्दात निर्भत्सना केली तेव्हा ते आपल्या ६ शूर शिलेदारांसह पुन्हा बहलोलखानावर चालून गेले. शेवटी नेसरी येथील चकमकीत धारातीर्थी पडले.

• हंसाजी उर्फ हंबीरराव मोहिते (१६७४-१६८०) - महाराणी सोयराबाईंचे हे बंधू आधी प्रतापरावांच्याच हाताखाली होते पण यांचे शौर्य बघून महाराजांनी त्यांना सेनापती केले व हंबीरराव ही उपाधी दिली. वर्षभरात त्यांनी बुऱ्हाणपूर ते माहुरपर्यंत मुघल प्रदेश लुटला. दक्षिणेकडे यांनी एकोजीराजे भोसल्यांविरुद्ध उत्तम कामगिरी केली शिवाय हे शिवाजी महाराजांच्या नंतर सम्भाजी महाराजांकडून उभे राहिले व इतिहासास यांनीच कलाटणी दिली. १६८७ मध्ये सर्जाखानशी लढताना हंबीररावांना वीरमरण आले.