छत्रपती

[एक आठवण शिवरायांची][bsummary]

किल्ले

[गड किल्ले][bigposts]

रणझुंजार मावळे

[वीर मावळे][twocolumns]

छत्रपती शिवरायांच्या व्यापारी धोरणची साक्ष देणारी किल्ले रायगडावरील जगप्रसिद्ध “बाजारपेठ

छत्रपती शिवरायांच्या व्यापारी धोरणची साक्ष देणारी किल्ले रायगडावरील जगप्रसिद्ध “बाजारपेठ”....

गडावर नामांकित बाजार जर कुणी उभारला असेल तर तो छत्रपती शिवरायांनी.. इतका प्रजाहितदक्ष राजा दुसरा झाला नाही... त्यांनी रायगडावरल्या सर्व वास्तूत देखणी अशी भव्य बाजारपेठच उभारली.. मध्ये भला रुंद रस्ता, दो बाजूना अगदी मापीव अशी दुकाने.. प्रत्येक दुकानास माल साठवण्याकरिता मागे दोन खोल्या आणि खाली तळघर सारे कसे एका सुतात..रेषाबद्ध.. दुकानांची उंची इतकी कि घोड्यावर बसल्या बसल्या सहज माल खरेदी करता यावा प्रत्येक बाजूला बावीस बावीस दुकानाचे दोन गाळे दोन्ही गाळ्यांच्या मध्ये रस्ता....
ज्या वेळी राज्याभिषेक झाला त्यावेळचे या बाजाराचे वैभव दृष्ट लागण्याजोगे असे केवळ वैभव नव्हे तर स्वच्छता देखील....

छत्रपतींच्या शिस्तीत वाढलेले रामचंद्रपंत लिहितात की...,
“बाजारात केर अजिबात पडू न द्यावा, तो लगोलग झाडून जाळून टाकावा राख होईल ती गडाखाली फेकायची नाही घरोघरी परसांत टाकायची..ती राखही परसांत टाकून घरोघर होईल ते भाजीपाले करवावे...”
केवढा हिशेबीपणा । केवढी शिस्त ।

#दुर्गदुर्गेश्वरावरील_बाजारपेठेसबंधी काही समकालिन उल्लेख.... ✍️

१)संभाजीराजे आपल्या "बुधभूषणम्" या ग्रंथात लिहतात.
"तो हे(शिवराय) ज्यांचा गड राजप्रासादांनीं,वाडयांनी,बाजारपेठेतील चौकाने,काठोकाठ भरलेल्या नव सरोवरांनी,विद्वान वैदिकांनी, श्रेष्ठ वैद्यांनी, ज्योतिषांनी, आद्य सत्प्रवृत्त मंत्रिजनांनी व असंख्य अशा चतुरंग दळांनी खूलून दिसत आहे."...✍️
२)९१ कलमी बखर-"दुकानांची चिरेबंधी करविली"...✍️
३)सभासद बखर-"बाजार" हाच उल्लेख करतो...✍️
४)मराठी साम्राज्याची छोटी बखर-"दुकानांची चिरेबंधी करविली"...✍️
५)१०९ कलमी बखर-८६ वे कलम-"बाजारचे रस्ते चिरबंदी जोती दुरुस्त फोडवून बांधली."...✍️
६)शिवसमाधीसमोरील तो शिलालेख
"वापी कूपतडागराजी रुचिरं रम्यं वनंवीतिके।
स्तंभै: कुंभिगृहे नरेंद्रसदनैरभ्रंलिहैमींहीते।।"
यातील 'वीतिके' या संस्कृत शब्दाचा अर्थ रस्ता किंवा बाजार असा होतो. वरील समकालीन साधनांत व दस्तुरखुद्द संभाजीराजे या चौकाचा बाजारपेठेचा चौक असाच उल्लेख करतात...✍️

✍️ गो.नी.दांडेकर यांच्या ‘महाराष्ट्र दर्शन’ पुस्तकातून...,