छत्रपती

[एक आठवण शिवरायांची][bsummary]

किल्ले

[गड किल्ले][bigposts]

रणझुंजार मावळे

[वीर मावळे][twocolumns]

वेडात मराठे वीर दौडले सात

वेडात मराठे वीर दौडले सात⛳


वेडात मराठे वीर दौडले सात असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते ते शूर सेनानी म्हणजे,प्रतापराव गुजर,विसाजी बल्लाळ,दिपोजी राउतराव विठ्ठल,पिळाजी अत्रे,कृष्णाजी भास्कर,सिद्दी हिलाल व विठोजी होय.प्रतापराव गुजर या महान सेनापतीने मोठा पराक्रम केला होता.त्यांचे व बेलोलखान यामधील युध्द इतिहासात प्रसिध्द आहे.या सात वीरांनी सुमारे बारा हजारच्या बेलोलखानाच्या सैन्यावर चाल करून मोठा पराक्रम केला.ही लढाई कोल्हापूरजवळच्या नेसरी येथे झाली.सभासदाच्या बखरीत प्रतापराव गुजर या महान सेनानीबद्दल पुढीलप्रमाणे लिहिले आहे.पन्हाळगडाच्या लढाईच्या समयी नेताजी पालकर समयास न आल्यामुळे मराठ्यांचे मोठे नुकसान झाले होते.यामुळे राजियांनी नेताजी पालकर यास बोलावून आणिला,आणि 'समयास कैसा पावला नाहींस?'म्हणून शब्द लावून,सरनोबती दूर करून,राजगडचा सरनौबत कडतोजी गुजर म्हणून होता,त्यांचे नाव दूर करून,प्रतापराव ठेविले,आणि सरनोबती दिधली.प्रतापरावांनी सेनापती करीत असतां शाहाण्णव कुळींचे मराठे चारी पादशाहींत जे होते व मुलखांतजे जे होते ते कुल मिळविले.पागेस घोडीं खरेदी केलीं.पागा सजीत चालिले व शिलेदार मिळवित चालिले.असा जमाव पोक्त केला.चहूं पादशाहीत दावा लाविला.विजापूराहून आलेल्या बेलोलखान याने बारा हजार स्वारांनिशी स्वराज्यावर चाल करून मोठा धुमाकूळ घातला होता,रयतेवर अनन्वित अत्याचार केले होते.महाराजांनीप्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा हुकूम केला.प्रतापरावांनी गनीमीकाव्याने बहलोलखानास जेरीस आणून त्याचा पराभव केला.बहलोलखान आपल्या सैन्यासह शरण आला.शरण आलेल्या बहलोलखानास मोठ्या मनांनी प्रतापरावांनीत्यांस सोडून दिले.रयतेचे हाल करणार्या बहलोलखानास सोडल्यामुळे महाराजांनी प्रतापरावांस,'बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका.'असे पत्र धाडिले.राजियांचे पत्र मिळताच प्रतापराव सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले.आपल्या छावणीच्या जवळच असलेल्या नेसरी येथे बहलोलखानाचा तळ पडला आहे.असे हेरांकडून त्यांना कळाल्यावर ते तडक घोड्यावर बसून एकटेच बहलोलखानाच्या छावणीवर चालून निघाले.त्यांच्या पाठोपाठ विसाजी बल्लाळ,दिपोजी राउतराव विठ्ठल,पिळाजी अत्रे,कृष्णाजी भास्कर,सिद्दी हिलाल व विठोजी हे वीर होते.या सात वीरांनी बारा हजाराच्या सैन्यामध्ये घुसून शेकडो गनीमांना ठार मारिले.पण अखेरीस प्रतापराव आणि सोबतचे सहा वीर मरण पावले.केवढे हे शौर्य या सात वीरांचे?साक्षातसमोर मृत्यु आहे हे माहीत असून,हजारों सैन्यावरी सात वीर चालून गेले.पराकोटीची स्वामीनिष्ठा आणि स्वराज्यावरील प्रेमापोठी या सात वीरांनी स्वत:स मरणाच्या हवाली केले.ही घटना ऐकल्यावर महाराजांना अतीव दु:ख झाले.या सात वीरांचे स्मारक महाराजांनी नेसरीजवळ उभारले.