छत्रपती

[एक आठवण शिवरायांची][bsummary]

किल्ले

[गड किल्ले][bigposts]

रणझुंजार मावळे

[वीर मावळे][twocolumns]

तोरणा

*💫वेल्ह्याच्याच डोक्यावर एका उंच जागी बसला आहे हिंदवी स्वराज्याचा एक मुख्य शिलेदार “तोरणा/प्रचंडगड”....🚩*
*ऊन, वारा, पावसाच्या नैसर्गिक कालचक्राशी सामना करीत आजही तेवढ्याच दिमाखात उभी असलेली ही तोरणाची “झुंजार माची”....*
*झुंजार माची विस्ताराने लहान पण आक्रमक.....*
*राजगडाच्या दिशेने निघालेल्या एका बलदंड सोंडेवरील हे नागमोडी बांधकाम म्हणजे एखादी सळसळणारी नागीणच.. सळसळत जात जिने एकदम आपला फणा वर उचलावा अशी.. या माचीच्या दोन्ही बाजूला खोल कडे आणि डोंगराच्या या धारेवरच दोन टप्प्यांमधील माचीचे बांधकाम ज्याला चिलखती बुरुजांनी आणखी भक्कम केले आहे तिचे वरून दिसणारे दर्शन जितके पोटात धडकी भरवणारे तितकेच तिच्या अंगाखांद्यावरून फिरताना भटक्यांना दरारा वाढवणारे...*
*छत्रपती शिवरायांच्या दुर्गाचे हे असले चंडिकेचे रूप पाहिले की उत्तरेकडील किल्ल्यांचे अस्मानी सौंदर्य त्यापुढे फिके वाटू लागते...*